मागील लेखातून आपण हरितक्रांती म्हणजे काय? आणि त्याच्या घटकाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण हरितक्रांती राबविण्यामागचा उद्देश काय होता? तसेच हरितक्रांतीचा परिणाम कसा झाला? याविषयी जाणून घेऊ.

हरितक्रांतीचे उद्देश कोणते होते?

हरीतक्रांतीचा अवलंब का करण्यात आला याबाबत आपण आधीच्या लेखामध्ये बघितले आहे. भारतामध्ये अन्नटंचाईचे भीषण संकट उदभवले होते, त्याकरिताच उपाय म्हणून हरितक्रांती राबविण्यात आली. या हरितक्रांतीचे काही महत्त्वाचे उद्देश होते, ते पुढीलप्रमाणे :

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

१) कृषी उत्पादन वाढवून निर्माण झालेले अन्नटंचाईचे संकट व दुष्काळ दूर करणे हा हरितक्रांती राबविण्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात भारतामध्ये अन्नाच्या तुटवड्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात भूकबळीची शिकार झाले. त्याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने हरितक्रांतीला सुरुवात केली.

२) त्याचबरोबर सीमित क्षेत्र हे अधिकाधिक कसे उत्पादित बनेल याकडे लक्ष देऊन या क्षेत्राला अधिकाधिक उत्पादक बनविण्याचा उद्देश होता.

३) वाढत्या लोकसंख्येच्ये प्रमाण बघता, त्यांच्याकरिता पर्याप्त अन्नधान्याची उपलब्धता व्हावी तसेच त्यांची अन्नाची गरज भागविणे.

४) गावांचा आणि उद्योगांचा विकास करण्यासाठी पारंपरिक कृषी पद्धतींचा वापर कमी करून कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे आणि कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे. त्यामध्ये ऊस, कापूस अशा पिकांचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार होता.

५) कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण करणे.

६) कोणत्याही परिस्थितीचा आणि कोणत्याही रोगांचा सामना करू शकतील अशा उत्पादक रोपांची निर्मिती करणे.

७) बिगरऔद्योगिक राष्ट्रांना कृषी उत्पादनाबाबत प्रोत्साहित करणे, कृषीसंदर्भात प्रसार करणे इत्यादी.

भारतामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीत हरितक्रांतीचा अवलंब करण्यावाचून दुसरा पर्याय उपलब्धच नव्हता. हरितक्रांतीमुळे अन्नधान्याच्या उपलब्धतेत झालेल्या वाढीमुळे अन्नटंचाईचे संकट दूर झाले. तसेच हरितक्रांतीचे अनेक सकारात्मक फायदे झाले. मात्र, याच हरितक्रांतीचे गंभीर स्वरूपाचे नकारात्मक परिणामदेखील झाले आहेत. त्यांचा आढावा आपण घेणार आहोत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?

अ) हरितक्रांतीचे सकारात्मक परिणाम :

१) अन्नधान्य उत्पादनात वृद्धी : हरितक्रांतीमुळे गहू आणि तांदुळ यांच्या संशोधित नवीन बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनांमध्ये वाढ होऊन, भारत जगातील सगळ्यात मोठा कृषी उत्पादक देश म्हणून नावारूपास आला.

२) अन्नधान्यांची निर्यात : हरितक्रांतीमुळे देशात मोठ्या प्रमाणात गहू व तांदळाचे उत्पादन होऊ लागले. त्यामुळे एकेकाळी कृषी अन्नधान्यांची आयात करणारा भारत देश हा निर्यात करण्याएवढ्या अन्नधान्यांचे उत्पादन करू लागला.

३) शेतकऱ्यांना लाभ : हरितक्रांतीमुळे जास्त शेतमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीयंत्रे, नवीन बि-बियाणे यांचा वापर केल्याने कृषी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला.

४) औद्योगिक विकास : हरितक्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात कृषीयोग्य अवजारांची (उदा. टॅक्टर, हार्वेस्टर, थ्रेशर, पंपिंग, डिझेल यंत्र, विद्युत यंत्र इत्यादी) मागणी वाढली. त्यामुळे अवजारे निर्माण करणाऱ्या उद्योगांचादेखील विकास होऊ लागला.

५) ग्रामीण रोजगार : दुहेरी कृषी उत्पन्न घेण्याच्या प्रणालीमुळे शेतामध्ये मजुरांची मागणी वाढली. त्यामुळे गावातील लोकांना शेतात रोजगार मिळाला. एवढेच नाही, तर कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने उद्योग क्षेत्र, विद्युत क्षेत्र इत्यादी क्षेत्रांतदेखील रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन मिळाले.

हरितक्रांतीनंतर शेती क्षेत्रात रोजगाराच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे मानण्यात येते. हरित क्रांतीच्या साह्याने वाढीव शेती उत्पादनातून भारतात अस्तित्वात असलेल्या उच्च उत्पन्न करणाऱ्या बियाणे किंवा एचवायव्ही बियाण्यांचा संपूर्ण संभाव्य फायदा घेण्यात आला. त्यामुळे कृषी क्षेत्रात एचवायव्ही बियाणे यशस्वी झाले.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

आ) हरितक्रांतीचे नकारात्मक परिणाम

हरितक्रांतीमुळे कृषी क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पडला असला तरी काही प्रमाणात नकारात्मक प्रभावसुद्धा दिसून आला आहे. हरितक्रांतीमुळे केवळ गहू, तांदूळ, बाजरी, मका या पिकांचे उत्पन्न घेण्यावर मोठ्या प्रमाणात भर होता. मात्र, यांव्यतिरिक्त मोट, तीळ, ज्यूट, कापूस, चहा इत्यादी कृषी उत्पादनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या बीजांच्या संकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरीही ते पीक घेण्याचे टाळत होते.

१) सामाजिक-आर्थिक परिणाम : हरितक्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, शेतकऱ्याच्या उत्पन्नामधील तफावतीमुळे हरितक्रांतीबरोबरच भारतामध्ये वैयक्तिक, तसेच प्रादेशिक विषमतेमध्येही त्याच प्रमाणात वाढ झाली होती. त्यासोबतच हा संपूर्ण असमतोल शेती पद्धतीमध्येही निर्माण झाला होता. गहू आणि तांदळाला अधिक प्राधान्य देण्यात आले; तर डाळी, तेलबिया, मका यांसारख्या आवश्यक असणाऱ्या पिकांकडेदेखील दुर्लक्ष झाले, असे नकारात्मक परिणामही दिसून आले.

२) जीवसंस्थेवरील परिणाम : हरितक्रांतीचा सर्वाधिक विध्वंसक नकारात्मक परिणाम म्हणजे जीवसंस्थेसंबंधित झालेला परिणाम होता. हरितक्रांतीचा सकारात्मक परिणाम म्हणजेच होत असलेला फायदा बघून त्याच्या नकारात्मक परिणामांकडे सरकार, तसेच शेतकऱ्यांनीही लक्ष दिलेच नाही.

३) जमिनीची सुपीकता खालावली : हरितक्रांतीमुळे जमिनीच्या सुपीकतेवर जो परिणाम झाला, तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. अमर्यादित रासायनिक खतांचा वापर, तसेच पुन:पुन्हा एकाच पिकाचे उत्पादन आणि जमिनीचा वारेमाप वापर, त्यासोबतच पिकांच्या योग्य संयोजनाचा अभाव, पिकांची तीव्रता इत्यादींमुळे जमिनीची सुपीकता ही बहुतेक नष्टच झाली.

४) पाण्याचे दुर्भिक्ष : हरितक्रांतीमध्ये सिंचन या घटकाचा समावेश असल्याने सिंचनाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. नवीन बियाणांना सिंचनाची आवश्यकता असल्याने पीक उत्पादन घेण्यासाठी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले.

५) पर्यावरणाची हानी : रासायनिक खते, कीटकनाशके व औषधी वनस्पतींच्या अमर्यादित आणि अनियंत्रित वापरामुळे जमीन, पाणी व हवा असे सर्व घटक प्रदूषित होऊन पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. भारतामध्ये जंगलतोड आणि जीवसंस्थेच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या भागांमध्येही करण्यात आलेल्या शेतीच्या अट्टहासामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.