ऋषिकेश बडवे

विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय मानला जातो. दरवर्षी पेपर १मध्ये १०० पैकी किमान १५ ते कमाल ३० प्रश्न अर्थशास्त्रावर विचारलेले असतात, यावरून अर्थशास्त्राचे परीक्षेसाठीचे महत्त्व समजते. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनात बरेचसे समज-गैरसमज निर्माण झालेले दिसून येतात, जसे की अर्थशास्त्र पूर्णपणे चालू घडामोडींवर अवलंबून असते, अर्थशास्त्रासाठी खूप सारी आकडेवारी लक्षात ठेवावी लागते वगैरे. या दृष्टिकोनातून एक इंग्रजी म्हण बोलली जाते ती म्हणजे for economics you need to know everything under the sun.

Loksatta kutuhal Geoffrey Hinton a pioneer of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते जेफ्री हिंटन
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- नागरिकशास्त्र
career opportunities in the field of creative design after engineering degree
डिझाईन रंग-अंतरंग : अभियांत्रिकी पदवीनंतर ‘क्रिएटिव्ह डिझाईन’ क्षेत्रातील आकर्षक करिअर संधी…
Loksatta explained BBA BMS BCA courses easy or difficult
विश्लेषण: बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम आता सुकर की दुष्कर?
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक

आजच्या लेखातून आपण अर्थशास्त्राविषयीच्या अशा गैरसमजांना दूर करून या विषयाच्या तयारीचा आढावा घेणार आहोत. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना मूलभूत संकल्पनांवर भर देणे अतिशय गरजेचे असते. गतवर्षींच्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, विचारण्यात येणारे प्रश्न मूलभूत संकल्पना व चालू घडामोडी यांवर विचारलेले आहेत. त्यापैकी ६० ते ७० टक्के प्रश्न संकल्पना व त्यांचे अनुप्रयोग यावर अवलंबून असतात व राहिलेले प्रश्न चालू घडामोडींवर अवलंबून असतात. या पेपरच्या तयारीत विद्यार्थी फक्त चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करतात व मूलभूत संकल्पनांकडे काहीसे दुर्लक्ष होते अथवा मूलभूत संकल्पनांचा अभ्यास तुटक पद्धतीने केला जातो. ही पद्धत सोपी आणि आकर्षक वाटते. परंतु परीक्षेच्या दृष्टीने ही पद्धत फारच कुचकामी आहे. तयारी करताना मूलभूत संकल्पना व त्यांचे परस्पर संबंध शिकून अणि समजून घेणे गरजेचे आहे, संकल्पना समजल्यानंतर आपण या संकल्पनांना चालू घडामोडींची जोडणी देणे गरजेचे आहे. अशाप्रकारे पूर्व परीक्षेसाठी अर्थशास्त्राची तयारी एकात्मिक पद्धतीने करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर अभ्यासाची तयारी करताना NCERT क्रमिक पुस्तकांचे महत्त्व कायमच अधोरेखित केले जाते. परंतु अर्थशास्त्र हा चालू घडामोडींवर आधारित विषय आणि या क्रमिक पुस्तकांमध्ये चालू घडामोडी नसल्यामुळे विद्यार्थी यांकडे पाठ फिरवतात. परंतु वर चर्चिल्या प्रमाणे मूलभूत संकल्पना समजण्यासाठी या क्रमिक पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. NCERT च्या क्रमिक पुस्तकांपैकी इयत्ता १२ वीचे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे पुस्तक आणि ११ वी चे Indian Economic Development ही पुस्तके फार महत्त्वाची आहेत. या व्यतिरिक्त तमिळनाडू बोर्डची अर्थशास्त्राची पाठ्यपुस्तके देखील चांगले संदर्भ साहित्य ठरते. वर सांगितलेले साहित्य चांगले असले तरी पुरेसे नाही. अर्थशास्त्राची व्याप्ती पूर्व परीक्षेच्या दृष्टीने फार मोठी आहे, त्यामुळे एक मुख्य संदर्भ ग्रंथ देखील तयारीमध्ये समाविष्ट करणे गरजेचे असते. या यादीमध्ये रमेश सिंह, मिश्रा अँड पुरी, दत्त सुन्दरम या पैकी कोणत्याही एका लेखकाचा ग्रंथ वापरू शकतो. परंतु अशी पुस्तके डेटाने भरलेली असतात. त्यामुळे त्यांचे वाचन आणि अभ्यास फार निवडक पद्धतीने करावे लागते. डेटा आणि चालू घडामोडींसाठी अर्थसंकल्प, आर्थिक पहाणी अहवाल हे दोन प्रमुख संदर्भ आहेत जे बरेच विद्यार्थी दुर्लक्षित करतात. पूर्ण वर्षात सरकार जी धोरणे राबविणार असते त्याची ब्लू प्रिंट अर्थसंकल्पात सांगितलेली असते. बऱ्याचदा पूर्ण वर्षात येणाऱ्या नवनवीन योजनांची सुरुवात देखील आपल्याला अर्थसंकल्पात पाहावयास मिळते. त्याचबरोबर अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल हे संरचना असलेले निश्चित दस्तऐवज असल्याने त्याचा अभ्यास करणे व त्यातील डेटा लक्षात ठेवणे तुलनेने सोपे जाते, व त्यामुळे पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी सोपी होते.

त्याचबरोबर वृत्तपत्रे हा देखील रोजच्या अभ्यासातला एक प्रमुख घटक आहे. वृत्तपत्र वाचनासाठी लागणाऱ्या वेळेमुळे विद्यार्थी त्याचे पर्याय शोधतात, अशावेळी वृत्तपत्रातील माहितीला (डेटा) पर्याय मिळू शकतो. परंतु वृत्तपत्र वाचनाने विद्यार्थ्यांचा होणारा कौशल्य विकास, निर्णय क्षमता, विश्लेषणात्मक कौशल्य विकास साध्य होत नाही. ज्याला यूपीएससी च्या भाषेत ऑफिसर लाईक क्वालिटी असे म्हटले जाते. या क्वालिटीचा विकास न झाल्यास यशाचा मार्ग काहीसा धूसर होऊ शकतो. वृत्तपत्रे कमी वेळात परिणामकारकरीत्या वाचण्यासाठी the unique academy च्या youtube चॅनल वरील ‘वृत्तपत्रे कशी वाचावीत’ हा माझा सेमिनार जरूर पहावा. या व्यतिरिक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने छोटे छोटे डेटा संबंधित value added मटेरियल शेवटच्या काही महिन्यांमध्ये online उपलब्ध होत असते, ते चाळून घ्यावे. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना पूर्व परीक्षेचा वेगळा व मुख्य परीक्षेचा वेगळा असा अभ्यास करू नये. अर्थशास्त्राच्या संकल्पना एकमेकांशी अतिशय संलग्न असल्याने त्याचे विभाजन करून अभ्यास करणे चुकीचे ठरू शकते व संकल्पनांच्या अनुप्रयोगांमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे एकंदरच अर्थशास्त्राचा अभ्यास एकात्मिक पद्धतीने करावयास हवा.