इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (कठअ) इझिमाला, केरळ येथे जानेवारी, २०१९पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी अविवाहित पुरुष इंजिनीअर्सना भारतीय नौदलात सामील होण्याची संधी.

(१) एक्झिक्युटिव्ह ब्रँच –

(अ) जनरल सíव्हस /हायड्रोग्राफी कॅडर -४० पदे (शॉर्ट सíव्हस कमिशन ररउ)

पात्रता – बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा).

(ब) नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडर  (NAIC) (परमनंट कमिशन  (PC)  – ८ पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/केमिकल/कॉम्प्युटर सायन्स/आयटी इत्यादी.)

(२) टेक्निकल ब्रँच –

(क) इंजिनीअिरग ब्रँच (जनरल सíव्हस) (SSC) – २७ पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक. (मेकॅनिकल/इन्स्ट्रमेंटेशन/मेटॅलर्जी इत्यादी)

(ड ) इलेक्ट्रिकल ब्रँच (जनरल सíव्हस) (SSC)- ३३ पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर इत्यादी.)

सर्व पदांसाठी बी.ई./बी.टेकमध्ये किमान ६०% गुण आवश्यक. (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

ट्रेनिंग – (सब-लेफ्टनंट पदावर) टेक (जीएस्) आणि NAIC ऑफिसर्ससाठी २२ आठवडय़ांचे ट्रेनिंग आणि एक्झिक्युटिव्ह जीएस् (एक्स)/हायड्रो ऑफिसर्ससाठी ४४ आठवडय़ांचे ट्रेनिंग.

ट्रेनिंग दरम्यान ऑफिसर्स पूर्ण वेतन  इतर भत्ते मिळण्यास पात्र.

वेतन – दरमहा रु. ५६,१००/-  एमएसपी रु. १५,५००/-  इतर भत्ते.

प्रोबेशन कालावधी –  NAIC ऑफिसर्ससाठी ३ वष्रे; इतरांसाठी – २ वष्रे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी, १९९४ ते १ जुल, १९९९ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती – बी.ई./बी.टेक. मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना एस्एसबी मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. वैद्यकीय तपासणीत फिट ठरलेल्या उमेदवारांना एसएसबी गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.

www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर स्कॅन केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज  दि. २५ जानेवारी, २०१८ पर्यंत अपलोड करावेत.