बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कामगार / कक्ष परिचर / श्रमिक / हमाल / बहु उद्देशीय कामगार / स्मशान कामगार / आया इत्यादी संवर्गातील १३८८ रिक्त पदांची भरती.

(खुला – ५०४, अजा – २२३, अज -१०८, विजाअ – ४८, भजब – ३४, भजक – ५१, भजड – ३२, विमाप्र – ३२, इमाव – ३५६.)

महिलांसाठी ३० : ए, माजी सनिक – १५ : ए, प्रकल्प ग्रस्त (केवळ मनपा प्रकल्पांसाठी) – ५ : ए, खेळाडू – ५ : ए, बृहन्मुंबई मनपामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व NCTVT  परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार – १० : ए आरक्षण.

पात्रता –  इयत्ता १० वीची परीक्षा १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण.

वयोमर्यादा –  दि. ३०/११/२०१७ रोजी १८ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय १८ ते ४३ वष्रे), (बृहन्मुंबई महानगरपालिकेमधून प्रशिक्षण घेऊन NCTVT उत्तीर्ण केलेले उमेदवार १८ ते ४५ वष्रे.)

वजन व उंची –  पुरुष उमेदवार किमान वजन ५० कि.ग्रॅ. व उंची १५७ से.मी.

महिला उमेदवार :-  किमान वजन – ४५  कि.ग्रॅ., उंची :- १५० सेमी.

निवड पद्धती –  उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेण्यात येईल. यातील उच्चतम गुणांनुसार आणि सामाजिक व समाईक आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

ऑनलाइन लेखी परीक्षा १०० प्रश्नांची / १०० गुणांची असेल,

कालावधी – २ तास (मराठी – ४० गुण, इंग्रजी – १० गुण, सामान्य ज्ञान – २५ गुण आणि अंकगणित व तर्कज्ञान – २५ गुण.)

ऑनलाइन लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र, परीक्षा केंद्र याबाबतच्या सर्व सूचना  http://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वरील संकेतस्थळावर किंवा https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in/ या संकेत स्थळावर भेट देऊन “Labour Recruitment 2017” या िलकवर क्लिक करावे व सर्वप्रथम आवश्यक माहिती, ४.५ सेंमी ७ ३.५ सेंमी. आकाराचा फोटो व सही स्कॅन करून (२०-५० KB पर्यंत ) अपलोड करणे, ऑनलाइन पेमेंट करणे इत्यादी बाबींची पूर्तता केल्यानंतर उमेदवारास अर्ज क्रमांक मिळेल. त्यानंतर अर्जाची िपट्र काढून स्वत:जवळ ठेवावी.

ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र दि. १५ जानेवारी २०१८ पासून डाऊन लोड करता येतील. ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी २०१८ च्या दुसऱ्या / तिसऱ्या आठवडय़ात होईल. ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती फेब्रुवारी २०१८ च्या चौथ्या आठवडय़ात मिळेल. अंतिम निवड यादी एप्रिल २०१८ च्या दुसऱ्या आठवडय़ात प्रसिद्ध होईल. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दि.  ३१ डिसेंबर २०१७ आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर पुढील पदांची भरती.

(सेतू सुविधा केंद्र)

१) कंत्राटी साहाय्यक कार्यक्रम अधिकारी (१० पदे). पात्रता – एमबीए, एमएसडब्ल्यू किंवा पदव्युत्तर पदवीधारक.

२) कंत्राटी तांत्रिक साहाय्यक (१० पदे).

पात्रता – डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअर /कृषी अभियांत्रिकी पदवी/कृषी पदवी/वनक्षेत्रातील पदवी.

दोन्ही पदांसाठी कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. मानधन दरमहा रु. १४,३००/-. थेट मुलाखत (Walk-in-interview) पद्धतीने उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. थेट मुलाखतीसाठी दि. २ जानेवारी, २०१८ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर, पाश्र्वनाथ-९, बिडको नाका, पालघर (प.), जि. पालघर येथे उपस्थित राहावे.