न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य (जाहिरात क्र. १/२०१८) मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नांदेड, अमरावती व कोल्हापूर प्रयोगशाळेतील गट व गट पदांची भरती.

(१) वैज्ञानिक साहाय्यक गट (क) (सायंटिफिक असिस्टंट) – २० पदे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

पात्रता – रसायनशास्त्र किंवा न्यायसाहाय्यक विज्ञान पदवी किमान द्वितीय वर्गासह उत्तीर्ण.

(२) वैज्ञानिक साहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) – ७३ पदे.

पात्रता – बी.एस्सी. (फिजिक्स/संगणकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/माहिती तंत्रज्ञान) किंवा बी.ई. (संगणकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी) पदवी किमान द्वितीय वर्गासह उत्तीर्ण.

(३) वरिष्ठ प्रयोगशाळा साहाय्यक – १० पदे.

पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण.

(४) वरिष्ठ लिपिक (भांडार) – २ पदे.

(५) कनिष्ठ प्रयोगशाळा साहाय्यक – ७ पदे.

पात्रता – पद क्र. ४ व ५ साठी विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

(६) लिपिक टंकलेखक – १२ पदे.

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (प्रमाणपत्र)

(७) दूरध्वनी चालक – १ पद (इमाव)

पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त शासकीय संस्थेचे प्रमाणपत्र.

(८) वाहनचालक – ३ पदे.

पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि हलके/मध्यम/जड वाहन चालविण्याचा परवाना.

(९) प्रयोगशाळा परिचर गट-ड – ९ पदे. पात्रता – दहावी नापास.

(१०) चपरासी (गट-ड) – ३ पदे. (अज/विजा(अ)/खुला प्रत्येकी – १) पात्रता – दहावी उत्तीर्ण.

महिलांसाठी ३०% आरक्षण. काही पदे विकलांगांसाठी, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त यांच्यासाठी राखीव.

वयोमर्यादा – दि. २४ मार्च, २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय – ४३ वष्रेपर्यंत) (विकलांग – ४५ वष्रेपर्यंत)

परीक्षा शुल्क – रु. ५००/-,

मागासवर्गीय – रु. २५०/-. (माजी सनिकांना शुल्क माफ असेल.)

लेखी परीक्षेचे स्वरूप – कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

पद क्र. १ ते ७ साठी २०० गुण,

पद क्र. ८ साठी ६० गुण आणि व्यावसायिक चाचणी ४० गुण,

पद क्र.९ व १० साठी १०० गुण.

वरिष्ठ प्रयोगशाळा साहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक (भांडार) या पदांसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार असल्याने उमेदवारांना दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करता येईल. परंतु प्रत्येक पदासाठी वेगवेगळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील.

ऑनलाइन अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर दि. १२ एप्रिल, २०१८ पर्यंत करावेत. संचालनालयाच्या  https://dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरदेखील ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) कंबाइंड जीओ-सायंटिस्ट अँड जीओलॉजिस्ट एक्झामिनेशन, २०१८

दि. २९ जून, २०१८ पासून घेणार आहे.

जीओलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये जीओलॉजिस्ट (१४ पदे), जीओफिजिसिस्ट (१७ पदे) आणि केमिस्ट ग्रूप-ए (६ पदे) आणि सेंट्रल वॉटर बोर्डमध्ये ज्युनियर हैड्रॉलॉजिस्ट (सायंटिस्ट-बी) ग्रूप-ए (२३ पदे) पदांची भरती.

(१) जिऑलॉजिस्ट – ग्रूप-ए – पात्रता – जीऑलॉजिकल सायन्स/ जीऑलॉजी/अ‍ॅप्लाइड जीऑलॉजी/जीओ केमिस्ट्री इ. विषयांतील पदव्युत्तर पदवी.

(२) जीओफिजिसिस्ट – ग्रूप-ए – पात्रता – एम.एस्सी. (फिजिक्स/अ‍ॅप्लाइड फिजिक्स/जीओफिजिक्स, इ.)

(३) केमिस्ट – ग्रूप-ए – पात्रता – एम.एस्सी. (केमिस्ट्री)/ अ‍ॅप्लाइड केमिस्ट्री/अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री.

(४) ज्युनियर हायड्रॉलॉजिस्ट (सायंटिस्ट-बी) – ग्रूप-ए – पात्रता – जीओलॉजी/ अ‍ॅप्लाइड जीओलॉजी/मरिन जीओलॉजी विषयातील पदव्युत्तर पदवी. अंतिम वर्षांचे उमेदवार प्रस्तुत परीक्षेस बसण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – १ जानेवारी, २०१८ रोजी २१ ते ३५ वष्रे (इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे, विकलांग – ४५/४८/५० वष्रेपर्यंत)

परीक्षा शुल्क – रु. २००/-  (अजा/अज/महिला यांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १६ एप्रिल, २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com