डॉ. आशीष  देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com

हा लेख तुमच्या हातात येईपर्यंत आणि रुग्णसंख्या कमी झाली नाही तर भारतामध्ये दर दिवशी ४ लाखांच्या आसपास ‘करोना’ रुग्ण होत असतील. अडीच हजाराच्या आसपास लोकांचे मृत्यू होत असतील. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कॉन्सण्ट्रेटर, रेमडेसिविर हे शब्द परवलीचे झाले असतील. निवडणुका, कुंभ (कुं भमेळा), सामाजिक स्वास्थ्याबाबतच्या सोयींची दुर्दशा, लसटंचाई- चूक कोणाची? यांवर बातम्यांमधून जोरदार चर्चा होत असेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या विश्वविद्यालयातले ‘तर्कतीर्थ’ अंगुठेबहाद्दर आपल्या वैचारिक (?) बांधिलकीला साजेसं नि बुद्धीला समजेनासं काहीही धडाधडा ‘फरवडत वा फॉर्वर्डत’ असतील. आणि मरणारे मरत असतील नि तसेच मरत राहातील.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

ज्ञानेश्वरांच्याच शब्दांत सांगायचं, तर ‘दैन्यदु:खे न तपें, भयशोके न कंपे। देहमृत्यू न वासिपे, पातलेया।।’. अशा सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना स्थितप्रज्ञासारखं काहीही अंगाला लावून न घेता, ‘बिझनेस अ‍ॅज युजवल’ असं वागत राहायला फारच वेगळं मनोबल हवं नि तशी माणसं दिसतातही. करोना रुग्णांना पापी, मरण्यायोग्य ठरवून आपल्या बुद्धीची लक्तरं जाहीरपणे मांडणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात तसं, ‘एक तटस्थ मानसी, एक सहजचि आळसी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी।’. अशा भयावह परिस्थितीत अटलबिहारी वाजपेयींच्या ‘कौरव कौन कौन पांडव, टेढम सवाल हैं। दोनों ओर शकुनी का फैला कूट जाल हैं।’सारखा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

आपल्या मराठीत ‘त वरून ताकभात’, ‘शितावरून भाताची परीक्षा’, ‘सुतावरून स्वर्ग गाठणं’ असे वाक्प्रचार आहेत. परिस्थितीचं ‘वर्म’ जाणण्यासाठी माणसाच्या मनाकडून वापरल्या जाणाऱ्या या तीन पद्धती. वरकरणी सारख्या वाटणाऱ्या या पद्धतींचा वापर हा त्यातून निघालेल्या निष्कर्षांच्या योग्य-अयोग्यतेवर अवलंबून असतो. म्हणजे, निष्कर्ष बरोबर निघाला तर ‘वा! काय शितावरून भाताची परीक्षा केली’, नि चुकला तर ‘सुतावरून स्वर्ग गाठायला निघाला होता!’ आणि निष्कर्षांबद्दल साशंकता असेल, तर ‘त वरून ताकभात’. या करोनाकाळातदेखील असेच निष्कर्ष आपण सगळे काढत आहोत.

महासाथीची कुचंबणा आपण जरी पहिल्यांदाच अनुभवत असलो, तरी मानवजातीसाठी ती नवीन नाही. इसवी सन पूर्व ३०००- उत्तर पूर्व (ईशान्य) चीनमधील मोयोझिगू नि हमीन मांघा प्रांतात आलेल्या महासाथीमुळे  बेजार झालेल्या समाजानं शेवटी सर्व मृतदेहांना सामूहिक अग्नी दिला. इ.स.पू. ४३० मध्ये अथेन्स- स्पार्टाच्या ग्रीक इतिहासातील १६ वर्ष चाललेल्या लढाईत स्पार्टाला साथ दिली ती महासाथीनं! अथेन्सच्या सैन्यातले तरणेबांड सैनिक अचानक आजारी पडून मरायला लागले आणि वीरश्री स्पार्टाच्या गळ्यात पडली. इ.स. १६५-१८० मधील एन्टोईन प्लेग नि इ.स. २५०-२७१ मधील सायप्रियन प्लेग ५० लाखांच्या वर लोकांना मारून गेला, पण ‘नाही रे’ गटातील असंतोषाला वाचा फुटून राज्यकर्त्यांबद्दलचा असंतोष येशूच्या विचारांना तारून गेला, आणि राजा कॉन्स्टंटाईननं ईसाई धर्माचा स्वीकार केला. इ.स. ५४१-५४२ मध्ये बायझँटाईन साम्राज्यातल्या ब्युबोनिक प्लेगनं १० टक्के  स्थानिकांना मारलं आणि १६ व्या शतकातल्या इन्का आणि एझ्टेक साम्राज्यांतल्या अमेरिकन प्लेगनं ९० टक्के  स्थानिकांना! इ.स. १३४६-१३५३ मध्ये युरोपमध्ये थैमान घालणारा ‘काला आझार’ अस्वच्छतेत राहाणाऱ्या इतक्या गरीब कामगारांना जीवे मारून गेला, की त्यानंतर त्यांची कामं करण्यासाठी ‘यंत्र’ तयार करणं भाग पडलं आणि युरोपात यांत्रिकीकरणाची मुहूर्तमेढच रोवली गेली, ज्यातून जहाजं आली नि शस्त्रंही. पंधराव्या शतकानंतर झालेल्या साम्राज्यशाहीची पाळंमुळं इथेच कुठे तरी रोवली गेली असावीत. इ.स. १६६५-६६ मधला लंडन प्लेग आणि नंतर लागलेली भीषण आग नागरी सुव्यवस्थेसाठी कारणीभूत ठरल्या. १९१८-१९२१ पर्यंत राहिलेल्या स्पॅनिश फ्लूला भारताची पावणेदोन कोटी लोकसंख्या बळी पडली. जगातील ५ कोटी मृत्यूंपैकी १/३ मृत्यू भारतात होते. पण तरीही पुढच्या १० वर्षांत लोकांना त्याचा बऱ्यापैकी विसर पडला होता आणि असाच विसर सर्वच महासाथींनंतर पडताना दिसतो.

इस्त्रायली लेखक युवाल नोहा हरारी त्याच्या ‘होमो डिअस’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतो, ‘दुष्काळ, रोगांच्या साथी आणि युद्धं माणसाच्या पृथ्वीतलावरील जगण्याला सततच आव्हान देत आली. माणसाची त्यांसमोरची हतबलता इतकी स्वाभाविक होती की कित्येक विचारवंतांनी नि मसीहांनी तिला निसर्गाच्या अपूर्णतेचं प्रतीक मानलं, नि अंतिम नाशाचं कारणही. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला हे सगळं बदललेलं होतं. सध्या भूकबळींपेक्षा अतिखाण्यानं; साथींपेक्षा वार्धक्यानं; युद्ध-हिंसा-आतंकवादापेक्षा आत्महत्येमुळे जास्त माणसं मरतात. आधुनिक विज्ञान जीवन आणि मृत्यूकडे एका तांत्रिक प्रश्नासारखं बघतं, नि त्यांची गुपितं उलगडण्याची आशा बाळगतं. मानव Homo sapiens  कडून Homo deus च्या उत्क्रांतीतील महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचला आहे.’

हरारीची देवत्वापर्यंतची भरारी कदाचित विपर्यासाची वाटेल. पण गंमत अशी आहे, की या करोनामध्ये आपण आपल्या चिनी, इटालियन, ब्राझिलीयन, आफ्रिकन किंवा भारतीय भाऊबंदांशी संवाद साधून कु ठे कुठे काय काय मोर्चेबंदी चालली आहे, कोणती लस काढतायत, कुठलं नवीन औषध शोधतायत हे समजू शकतो. करोना कसा वाढतोय, बदलतोय, पसरतोय, सोकावतोय हे शास्त्राच्या मदतीनं समजून घेऊ शकतो. एकमेकांना सांगतो नि  एकमेकांची मदतही करू शकतो. जागतिक मदतीचे हात एकमेकांना सावरायला पुढे आलेले लवकरच दिसतील. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे।’. या विश्वबंधुत्वानं लवकरच २०२०-२१ चं हे करोनायुगदेखील पुढच्या काही वर्षांत इतर महासाथींसारखं इतिहासकालीन होईल की काय अशी भीती आहेच.

पण ते इतिहासकालीन झालेलं पाहाण्यासाठी आपण जगणं महत्त्वाचं आहे, नि त्यासाठी आपली स्वत:ची काळजी घेणं अतिमहत्वाचं! घरातूनच काम करा, बाहेर पडताना

दोन मास्क- नाक व तोंड झाकतील असे घाला, एकमेकांपासून ४ हात दूरच राहा, सारखे हात धुवा, बरं वाटत नसेल तर तत्परतेनं चाचणी करून रिपोर्ट यायच्या आधीपासूनच स्वत:ला विलग करा, लवकरात लवकर लस

(जेव्हा मिळेल तेव्हा) घेऊन टाका. सगळी लग्नं, वाढदिवस, समारंभ २०२२ साठी राखून ठेवा. ‘सर सलामत तो पगडी पचास’ उगाच नाही म्हणत!

२०१९ मार्चपासून सगळेच बाळगोपाळ, आई-बाबा, आजी-आजोबा घरात अडकलेत. भीती, काळजी, कंटाळा, कोंडलेपणा सगळ्यांनाच त्रासतोय. मनात नकारात्मकता, चिडचिड, वैफल्य सगळेच अनुभवतायत. अशा वेळी ‘भांडय़ाला भांडं लागणं’ हा सदाचार ठरेल. या महासाथीला नामोहरम करण्यासाठी ‘घरात राहा-घरात राहा’ असा घोषवारा चालला आहे, त्या घरात राहावं असं वाटलं तरी पाहिजे! घर चार भिंतीनी बनत नाही; त्यातल्या नात्यांनी बनतं. मग ही नाती जपण्यासाठी आपण काय करू शकतो?

घर सगळ्यांचं आहे, त्यामुळे सगळ्यांना व्यक्त व्हायला मुभा असलीच पाहिजे. छोटे, मोठे, आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकी सगळ्यांनाच नकारात्मक विचार जाणवणार. ते मनात साचले की वाईट, प्रवाही राहिले तर चांगले. ‘एका देशी होतो अहंकारे आथिला, त्याच्या त्यागे जाला सुकाळ हा!’, या उक्तीप्रमाणे वय विसरून बोला नि बोलतं करा.

आपण बऱ्याच वेळा म्हणतो, ‘प्रेमानं दिलेली शिवीदेखील ओवीसारखी वाटते!’ पण त्याविरुद्ध अनुभवसुद्धा तितकाच खरा. म्हणजे, ‘नैराश्यात गायलेली ओवीदेखील शिवीसारखी बोचते!’ घरच्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवायचे हे दिवस आहेत. बघा, अख्खं जग एकमेकांना सहकार्य करायला पुढे येतंय. आपण तर रक्ताचे नातेवाईक नि सख्खे शेजारी. एकमेकांच्या संवादाला शब्दार्थानं हाकू नका, मथितार्थानं हाका. आणि हा प्रयत्न फक्त दुसऱ्यानंच करावा, मी नाही; असा समज करून घेऊ नका.

गेल्या लेखात अलेक्झांडर पोपनं म्हटल्याप्रमाणे ‘to err is human, to forgive is divine’. चुका करायची मुभा फक्त स्वत:साठीच राखून ठेवू नका, दुसऱ्यांनाही द्या नि दुसऱ्यांना माफ करायला स्वत:ला शिकवा.

सध्या एकमेकांबद्दल, परिस्थितीबद्दल नकारात्मकता नाही आली मनात, तर ‘दाल में कुछ काला हैं!’ हे नक्की समजा. पण सारखं सारखं नकारात्मक विचारांचं गुऱ्हाळ चाललं असेल, तर मात्र गेल्या आधीच्या लेखांमधले हॅम्लेटसारखे विवेकी विचारांचे ५ नियम वापरा आणि दुसऱ्यांनाही वापरायला शिकवा.

इंग्रजीत एक म्हण आहे, ‘Birds of the same feather, flock together!’. रक्ताची नाती नि ७ फेऱ्यांची नाती फार गुंतागुंतीची असतात आणि त्यामुळे पटकन बदलता येत नाहीत. पण मैत्री कशी अनिर्बंध असते. एकमेकांच्या आवडीनिवडी जुळल्या तर ठीक, नाही तर तू तुझा ठीक, नि मी माझा ठीक! अशी मैत्री घरातल्या नात्यांत होऊ शकते? त्यासाठी एकमेकांच्या आवडीनिवडीत रस घ्या आणि तो आस्वाद घेण्यासाठी वयाची, पिढीची आडकाठी येऊ देऊ नका. युगानुयुगं घरामध्ये प्रेम-सहकार्य-समजूतदारपणा विश्वास वाढवायला कारणीभूत ठरला आहे. तो विश्वास वाढवा!

जेवण-छंद-सणासुदीचे उपक्रम नात्यांना जवळ आणतात. एरवी घराबाहेरची कामं करणारी पुरुष मंडळी जर घरात टाळेबंदीमध्ये आहेत, तर त्यांनी या उपक्रमात हिरिरीनं भाग घ्यायला हवा. एकत्र राहात नसाल तर ऑनलाइन सुद्धा एकत्र येऊ शकता. बच्चेकंपनी, आजोबांसहित बाबांची टीम आई-आत्या-आजीच्या टीमला हरवायला कशी उत्साहानं कामाला लागेल ते पाहा.

वयं मोठं खोटं! विसरा आपलं वय. घरातल्या छोटय़ांसमोर आपल्या तरुणपणीचं शम्मी कपूर, राजेश खन्ना स्टाईलचं गाणं गात नाचा. तुमचा मोठा मुलगा म्हणेलही, ‘So lame!’. पण खरं सांगतो, मनातल्या मनात तोही सुखावेल नि एकदम उडी मारून ‘लि-ल बेब’चा ‘रॅप नंबर’ सुनावेल.

चांगले चित्रपट बघा टीव्हीवर. मोबाइल दूर ठेवा घरच्यांबरोबर असताना. मोबाइलमुळे जवळचे दूर होतात नि दूरचे जवळ. गोष्टी वाचा नि एकमेकांना सांगा. वाचनालयं बंद आहेत माहीत आहे मला, पण आपल्या शेजाऱ्यांकडची, मित्रांकडची पुस्तकं नाही का आपण वाचू शकत! पुस्तकं देत-घेत असताना गप्पा मारू नका, पण कुठे खिरीची वाटी, नाही तर तुम्ही केलेलं एखादं कटलेट घेऊन जायला काय हरकत आहे?

हे सगळं करता करता वेळ कसा जाईल हे कळणारदेखील नाही, नि येईल ती पहाट जेव्हा तुम्हाला परत ८:१२ ची चर्चगेट पकडायची घाई झाली असेल!