27 January 2021

News Flash

पायांची काळजी

० पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा चोळून लावा.

| July 11, 2015 01:01 am

० पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा चोळून लावा.
० आपली पादत्राणे नरम, आरामदायी घ्यावीत. भेगाळलेल्या पायांना घट्ट व कडक चपलांमुळे जास्त इजा होते.
० पायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापणे टाळा. कापताना त्वचा खेचली गेली किंवा कात्री लागली तर जखम चिघळून संसर्ग होण्याची शक्यता असते.
० रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय १० मिनीटे बुडवून ठेवा. असे केल्याने पायांना आराम वाटेल व धूळ, माती निघून जाईल.
० झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथब्रशने टाचा हलके-हलके घासून घ्या. नंतर कपडय़ाने स्वच्छ करून घ्या.
० साखर आणि साय एकत्र करून त्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्या, यामुळे भेगा कमी होतील.
० मेण आणि तूप गरम करून त्याचे थेंब भेगांवर नियमित सोडावे, त्यामुळे टाचा मुलायम राहतील.
० भेगांकडे दुर्लक्ष केल्यास कोरडेपणामुळे त्या रुंदावतात व त्यातून रक्त येते. काही वेळा चालताना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांना नियमित स्निग्ध पदार्थाने मसाज करावा.
० पावसाळ्यात पायांच्या नखांवर मॅचिंग किंवा पारदर्शक नेलकलर लावा. त्यामुळे नखांच्या कडेला माती साचून तेथे होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल,
० पावसाळ्यात शक्यतो बंद चप्पल किंवा सँडल वापरणे टाळा, बंद चपलांमध्ये ओलसरपणा राहातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.
० पावसाळ्यात सतत पाण्याशी संपर्क येत असल्याने पायाच्या बेचक्यांमधील त्वचा पांढरी पडते व गळून पडते, खाज सुटते, त्यातून रक्त येते. यासाठी चप्पल वा शूज घालण्यापूर्वी बोरिक पावडर असलेली टॅल्कम पावडर तेथे लावा. अँटिसेप्टिक मलमही लावू शकता.
संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2015 1:01 am

Web Title: foot precaution
Next Stories
1 बहुउपयोगी नेलपेंट
2 लॅपटॉपची सफाई
3 करून बघावे असे काही
Just Now!
X