27 June 2019

News Flash

कुंडीतील बाग – गच्चीवरची बाग

आधुनिक काळातली घरची परसबाग म्हटलं की, गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण ही बाग करू शकतो. आपण जर शेवटच्या मजल्यावर राहत असू तर उत्तमच.

| January 17, 2015 01:01 am

आधुनिक काळातली घरची परसबाग म्हटलं की, गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण ही बाग करू शकतो. आपण जर शेवटच्या मजल्यावर राहत असू तर उत्तमच. तुम्हाला गच्चीवर झाडं लावता येतील. कुंडय़ांशिवाय ही बाग असेल. जर खडबडीत जागा असेल तर त्या जागी एक फुटापेक्षा जास्त माती टाकावी. कोणती रोपे लावता येतील याची यादी करावी म्हणजे त्यादृष्टीने रचना करणे सोपे जाईल. याशिवाय कुंडय़ा, निकामी बेसिनपॉट किंवा प्लॅस्टिकच्या बकेट-पॉटही वापरता येतील. हे ठेवण्यासाठी चौकोनी दगड, विटा रचून केलेला ओटा किंवा बांधकाम करावे. कमी-जास्त उंचीवर ही रोपे लावावीत. प्रत्येक कोपरा हा मोठी झाडे लावण्यासाठी ठेवावा. झाडे तयार करताना डेकोरेशनच्या दृष्टीने, दिसायलाही ही मांडणी चांगली दिसतील अशी लावावीत. गॅलरीच्या दांडय़ांना हूक करून कुंडय़ा ठेवण्याची सोय करावी.

First Published on January 17, 2015 1:01 am

Web Title: home garden ideas
टॅग Plant,Terrace Garden