भारताच्या बँकिंग क्षेत्रात आज मोठय़ा प्रमाणात स्त्रीनेतृत्व कार्यरत आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ २०७ वर्षांच्या इतिहासातल्या पहिल्या स्त्री अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ठरलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांची नियुक्ती हा या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे. या नियुक्तीच्या निमित्ताने आज बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या, धडाडीने काम करणाऱ्या स्त्रीनेतृत्वाची ही थोडक्यात ओळख.
दे शातील मोठी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य यांची नेमणूक झाली. ती बातमी समजल्यावर बँकिंग क्षेत्रात अतिउच्च पदावर कार्यभाग सांभाळणाऱ्या सगळ्याच स्त्रियांना एक कडक सलाम ठोकावासा वाटला. या सगळ्याच जणींचं कर्तृत्व मोठं आहे.
मानवी जीवनात पैसा अतिमहत्त्वाची भूमिका बजावतो. तो पैसा बँकेच्या माध्यमातून फिरत असतो. बँकिंग इंडस्ट्री ही देशाची अर्थव्यवस्था सांभाळते, वाढवते आणि त्यावरून देशाच्या परिस्थितीचा अंदाज बांधता येतो. असे हे क्षेत्र आणि त्यामधील स्त्रियांचा सहभाग, त्यांचं योगदान वाखाणण्याजोगे, कौतुक करण्याजोगे आहे. सर्वच बँकांनी उइर -कोर बँकिंग सोल्युशन कार्यप्रणाली स्वीकारली आणि बँकांचा कायापालट झाला. आधीचे रूप पूर्ण बदलले आणि चकाचक फर्निचरसह प्रत्येकाच्या समोर कॉम्प्युटर टर्मिनल आले. मागील पंधरा वर्षांत बँकिंग इंडस्ट्री आमूलाग्र बदलली. बँक फायनान्स आणि कार्पोरेट विश्वात सीईओ पदावर अनेक स्त्रिया उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह रिसर्च फर्म एटअ-ढं१३ल्ली१२ कल्ल३ी१ल्लं३्रल्लं’ यांनी एका सर्वेक्षणाद्वारे नमूद केले की, ११ टक्केभारतीय कंपन्यांमध्ये सीईओपदी स्त्रिया आहेत. त्याच वेळी ‘फॉच्र्युन ५००’ यांनी जाहीर केलेल्या अमेरिकेच्या यादीप्रमाणे तेथील स्त्रियांची संख्या ३ टक्के आहे. मागील वर्षी अमेरिकेतील ‘फोर्ब्स’ पत्रिकेने घेतलेल्या आढावानुसार जगातील पहिल्या शक्तिशाली सामथ्र्यवान स्त्रियांमध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रातील दोन उच्चपदस्थ स्त्री अधिकारी आहेत, चंदा कोचर आणि शिखा शर्मा. हे भारतीय स्त्री वर्गाचं कर्तृत्व आहे, मोठी झेप आहे.
जागतिक अर्थव्यवस्था ही अतिशय संवेदनशील आहे. देशादेशांमध्ये आपापसांत अनेकविध प्रकारचे आर्थिक व्यवहार, पैसा हस्तांतरण वा इतर अनेक गोष्टी होत असल्याने एका देशावर अनेक देशांच्या आर्थिक गोष्टी अवलंबून असतात. रुपया आणि डॉलर यांचा सी-सॉचा खेळ आपण नुकताच अनुभवला. सांगायचा मुद्दा हा की, जेव्हा अमेरिकेत गृहकर्ज समस्या बिकट झाली. सबप्राइम समस्येने अमेरिक न इकॉनॉमी संकटात सापडली तेव्हा जगभरातील इतर सर्व देशांना फटका बसला, परंतु त्या वेळी आपली अर्थव्यवस्था डगमगली नाही. कारण बँकिंग आणि फायनान्स इंडस्ट्री मजबूत होती. सर्व बँकांची अग्रणी असलेल्या भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेची कार्यप्रणाली मजबूत असल्याने भारतास सबप्राइम फटका बसला नाही. जो बसला तो सहन करण्याची क्षमता आपल्याकडे नक्कीच होती. संपूर्ण जगभर रिझव्‍‌र्ह बँकेचे कौतुक केले गेले. जेव्हा एखादी व्यवस्था आपल्या पायावर ठाम उभी असते, तेव्हा त्या व्यवस्थेच्या खंद्या रक्षकांची भूमिका अहम असते. त्याच वेळी अनेक मोठमोठय़ा बँकांचे अध्यक्षपद, व्यवस्थापकीय संचालकपद स्त्रिया सांभाळीत होत्या. आहेत. नैना लाल किडवई, चंदा कोचर, मीरा सन्याल, मनीषा गिरोला, शिखा शर्मा, कल्पना मोरापोरिया व तोच पदभार सांभाळणारे इतर बँकांमधले पुरुष नेतृत्व आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वानी मिळून बँकिंग इंडस्ट्री सांभाळली. तेव्हा रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी उषा थोरात होत्या, हेही विशेष. बरेचदा जेव्हा घरात वादळ उठतं, तेव्हा बाई जास्त खंबीरपणे मुलाबाळांसकट घरातल्यांना आणि घराला सांभाळते, वाचवते. तिची आतली ऊर्जा उफाळून वर येते आणि पदर खोचून ती कामाला लागते. हेच चित्र इथेही दिसते.
या सगळ्या स्त्रीनेतृत्वातलं सध्याचं चर्चेतलं नाव म्हणजे अरुंधती भट्टाचार्य. भारतीय स्टेट बँकेच्या २०७ वर्षांच्या इतिहासातल्या त्या पहिल्या स्त्री अध्यक्ष आहेत. स्टेट बँकेच्या १९००० पेक्षा अधिक शाखा आहेत. ५ असोसिएट बँका आहेत. जगातील मोठय़ा बँकांच्या ओळीतील ही दुसऱ्या नंबरची बँक. जगभर १५७ कार्यालये आहेत. एवढय़ा मोठय़ा कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची क्षमता असल्यानेच त्यांची नेमणूक केली गेली. अरुंधतींनी १९७७ साली प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून स्टेट बँकेत प्रवेश घेतला.
पदोन्नती होत होत सरव्यवस्थापक पदापर्यंत गेल्या. स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट बँक इन्व्हेस्टमेंटच्या त्या उप सरव्यवस्थापक होत्या. तसेच बँकेच्या न्यूयॉर्क शाखेतही त्यांनी काम केलेले आहे. आता स्टेट बँकेचे अनुत्पादित कर्ज कमी करणे. वाईट परिस्थितीतील मोठमोठाली कर्ज खाती सुधारणे हे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान आहे.
अरुंधती भट्टाचार्य यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने आज बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या स्त्रीनेतृत्वाची थोडक्यात ओळख करून घ्यायलाच हवी. अरुंधती भट्टाचार्य यांच्यानंतर दुसऱ्या आहेत, अर्चना भार्गव. त्या दिल्ली विद्यापीठाच्या एमएस्सी आहेत. १९७७ साली पंजाब नॅशनल बँकेत त्या प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. वेगवेगळ्या पदावर काम करीत सरव्यवस्थापक झाल्या. कॅनरा बँकेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होत्या आणि २४ एप्रिल २०१३ पासून युनायटेड वेस्टर्न बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आहेत. ऑक्टोबर २०११ ते मे २०१३ या कालावधीत पुढील दोन संस्थांशी ट्रस्टी म्हणून संबंधित होत्या. एक आहे कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी आणि दुसरी आहे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड.
असंच एक सामथ्र्यवान नाव शिखा शर्मा यांचं. त्या आय. आय. एम. अहमदाबादच्या एमबीए आहेत. १९८० साली आयसीआयसीआय लिमिटेडमध्ये त्या नोकरीस लागल्या. या लिमिटेड कंपनीचे रूपांतर बँकेत होत असताना महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आयसीआयसीआय प्रुडेंशिअल इन्शुरन्सचा विस्तार केला. एप्रिल २००९ मध्ये प्रायव्हेट सेक्टरमधील तीन क्रमांकावर असणाऱ्या अ‍ॅक्सेस बँकच्या त्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक झाल्या. बँकेचा शाखा विस्तार दुपटीने वाढवला. आज या बँकेच्या १५०० शाखा आणि ८३०० एटीएमस् आहेत. शिखा शर्मा आपल्या कौटुंबिक जबाबदारीबद्दल म्हणाल्या, ‘‘बुद्धिमान स्त्रीला आई झाल्यावर बरेचदा नोकरी सोडून मुलांकडे बघावे लागते. मलासुद्धा मुले झाल्यावरची पहिली दोन-तीन वर्षे अत्यंत अवघड गेली. कामात तुम्ही कितीही परफेक्ट असलात तरी आई म्हणून मी कमी पडते ही भावना प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रीची असते. तशीच माझी होती. पण त्या ठरावीक काळात जर घरून चांगला सपोर्ट मिळाला तर स्त्रिया बरंच काही करू शकतात.’’ शिखा यांना घरून चांगला पाठिंबा होता आणि म्हणूनच रोज ११/१२ तास काम करून करिअर बनवणे त्यांना जमू शकले.
विजयालक्ष्मी अय्यर यांनी १९७५ साली ‘युनियन बँक ऑफ इंडिया’त प्रवेश केला. एक एक पदोन्नती घेत सरव्यवस्थापकपदी पोहोचल्या. २०१० मध्ये त्यांची नेमणूक ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट पदावर झाली आणि दोन वर्षांनी नोव्हेंबर २०१२ पासून बँक ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आहेत. एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया शेअर होल्डिंग लिमिटेड, दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या डायरेक्टर पैकी त्या एक आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात जोखीम असते. त्यासंबंधी ‘जोखीम व्यवस्थापन’ या विषयावरील त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
या सर्वामधलं एक ठसठशीत मराठी नाव म्हणजे शुभलक्ष्मी पानसे. यांनी १९७६ साली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये आपले करिअर सुरू केले. तेथेच सरव्यवस्थापकपदापर्यंत पदोन्नती घेत गेल्या. नंतर काही वर्षे त्या ‘विजया बँके’च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होत्या आणि सध्या ३ ऑक्टोबर २०१२ पासून त्या अलाहाबाद बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मे २००८ मध्ये त्यांनी बँकिंगमधील माहिती आणि तंत्रज्ञान यासाठी दिलेल्या विशेष योगदानासाठी त्यांना ‘बँकर ऑफ दि इअर’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच ‘वूमन अचिव्हर ऑफ दि इयर २०१३’ हाही पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
त्यांनी ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी अमेरिका फिलाडेफिया येथील तीन वर्षांचा  एमबीएचा अभ्यासक्रम ३२ महिन्यांत संपवला. त्या संदर्भात पानसे म्हणाल्या होत्या, ‘‘माझे योगदान नेहमी २०० टक्के असते.’’ अलाहाबाद बँकेत आल्यावर लगेचच त्यांना एक अपघात झाला होता. त्यांना दोन महिन्यांची बेडरेस्ट सांगितली असताना पानसे यांनी १३ दिवसांपासूनच घरून काम करायला सुरुवात केली आणि एका महिन्याने ऑफिसमध्येच यायला लागल्या. इथे त्यांची जबाबदारीची जाणीव, कामाप्रतीची निष्ठा दिसते. एक स्त्री म्हणूनच अनुभव खूप बोलका आहे. जेव्हा त्या विजया बँकेत कार्यकारी संचालक होत्या, त्या वेळची गोष्ट राजकीय पाठिंबा असलेल्या एक व्यक्ती बँकेचे ७ कोटींचे कर्ज ठेवून अचानक वारली. त्याची विधवा पत्नी हे कर्ज स्वीकारायला राजी नव्हती. तेव्हा पानसे तिला भेटायला गेल्या. एक स्त्री या नात्याने चौकशी केली आणि तिचा लहान मुलगा पाहून त्याचे शिक्षण भवितव्य आणि आताचे कर्ज जर फेडले नाही तर त्याच्या आयुष्यावरही तो ठपका एक काळा डाग म्हणून राहील, असे सुचविले. ते ऐकू न त्या स्त्रीने सर्व कर्जफेड केली आणि ती स्त्री शुभलक्ष्मी यांची मैत्रीण झालेली आहे.
बँकिंग क्षेत्रातील अतिशय खंबीर आणि लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व म्हणजे चंदा कोचर. आयसीआयसीआय या उद्योगक्षेत्राला कर्जपुरवठा करणाऱ्या सरकारी अर्थसंस्थेत १९८४ साली चंदा कोचर रुजू झाल्या. नंतर त्या संस्थेचे आयसीआयसीआय बँकेत विलीनीकरण झाले. ही प्रक्रिया होत असताना जोखीम घेऊन काम करणाऱ्या चंदा कोचर यांचे नेतृत्व, कामाचा आवाका तेथील नेतृत्वाला जाणवला आणि २००६ साली त्या याच खासगी बँकेच्या उपसरव्यवस्थापक झाल्या आणि १ मे २००९ पासून बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर त्यांची नियुक्ती झाली.
२०११ नोव्हेंबरमध्ये ‘फॉच्र्युन’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत सलग दुसऱ्यांदा त्या व्यवसाय क्षेत्रातील प्रभावशाली महिला ठरल्या. २०११ मध्येच अतिशय मानाच्या ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज आयसीआयसीआय बँकेत ३० टक्के  महिला कर्मचारी आहेत. जून २०१३ मध्ये एरियत बिझनेस लीडरशिप फोरमकडून त्यांना हेील्ल ऋ ढ६ी१ हे बिरुद मिळाले. तेव्हा चंदा कोचर म्हणाल्या, ‘‘समाधानी राहून आहे ते छान, असं म्हणणाऱ्या व्यक्तीची प्रगती तेथेच खुंटते. तो थांबतो.’’
एचडीएफसी आणि एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या १ जानेवारी २०१० पासून व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या रेणू कर्नाड यांचा गृहकर्जासंबंधीच्या योजना आखण्यात महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच होम लोन सव्‍‌र्हिसेस इंडिया प्रा. लि. च्या सह सरव्यवस्थापिका आहेत. स्विर्झलड येथील बीटीएस इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझरी कमिटीवर आहेत. ‘वल्र्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक’ यांच्याबरोबरही त्या काम करतात. एचडीएफसी गृहकर्ज विभागातच त्यांनी आपले करिअर सुरू केले. सुधारणा केल्या. वॉल स्ट्रीट जर्नल आणि वव्‍‌र्ह (श्ी१५ी) यांच्यातर्फे ‘ट२३ कल्लऋ’४ील्ल्रूं’ ंल्ल िड४३२३ंल्ल्िरल्लॠ ६ेंल्ल ऋ ्रल्ल्िरं ’अशी त्यांची खास ओळख देण्यात आली आहे आणि सर्वात जास्त पगार घेणाऱ्या त्या बिझनेसमन वूमन आहेत.
नैना लाल किडवाई ही पहिली भारतीय स्त्री जिने हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर्स पदवी घेतली. त्यांनी १९८२ मध्ये एमबीए केले. नंतर १९८२-९४ या काळात अठे ॅ१्रल्ल’िं८२ बँकेत होत्या. त्याच काळात स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत चीफ मॅनेजर रिटेल बँकिंग हा विभागही सांभाळत होत्या. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होत्या. परदेशी बँकांचे कार्य कसे असायला हवे यावर मार्गदर्शन क रणारी पहिली स्त्री म्हणजे नैना लाल किडवाई. सध्या त्या चेअरमन ऑफ एचएसबीसी, एचएसबीसी असेट मॅनेजमेंट इंडिया प्रा. या पदावर आहेत. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. त्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या पहिल्या महिला प्रेसिडेंट आहेत. त्यांना मानाच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’तर्फे  जागतिक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या महिलांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्तही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून त्या एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. सिटी ऑफ लंडन अ‍ॅडव्हायझरी कौन्सिल फॉर इंडिया या संस्थेचा पदभार त्या सांभाळतात. फॉच्र्युन ग्लोबल यादीमध्ये टॉप वूमन इन ‘बिझनेस’ यामध्येही त्यांचा समावेश आहे.
स्टेट बँक ऑफ त्रावणकोरमध्ये १९७६ पासून हमसिनी मेनन यांच्या करिअरची सुरुवात झाली. स्टेट बँक ग्रुपमध्ये अनेक पदभार सांभाळीत स्टेट बँक ऑफ बिकनेर अ‍ॅण्ड जयपूरच्या सरव्यवस्थापक झाल्या. त्यानंतर मे २०११ पासून त्या मुख्य स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या सरव्यवस्थापक म्हणून नियुक्त आहेत.
या सगळ्या जणी बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स क्षेत्रात अतिउच्च पदावर कार्यरत आहेत. भारतीय नारी काय काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे या नऊ जणी. तरी इथे अगदीच त्रोटक माहिती दिलेली आहे. प्रत्यकीने स्त्रीशक्तीचा वेगळाच ठसा उमटवला आहे. जागतिक स्तरावरील अनेक अनेकविध संस्थांच्या मार्गदर्शक म्हणून अतिशय आदराने त्यांच्याकडे बघितले जाते.
आतापर्यंत ज्यांचा परिचय करून घेतला त्या राष्ट्रीयीकृत, खासगी, परदेशी बँकांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर सहकारी बँकांची संख्याही खूप मोठी आहे. को-ऑपरेटिव्ह सेक्टर खूप विस्तृत आहे, शिवाय लहान-लहान गावांमध्ये ते पोहोचले आहे. तेथील लोकांचा विश्वास संपादन करून गावचे परिवर्तन करण्यात सहकारी बँकांचा पुढाकार आहे. केवळ महाराष्ट्रात स्त्रियांनी चालविलेल्या ३६ महिला सहकारी बँका आहेत. जवळजवळ या सर्व बँकांचे अध्यक्षपदीही स्त्रियाच आहेत. बँकिंग इंडस्ट्रीत या महिलांनी मोठी कामगिरी केली आणि आपापल्या बँकांचा विस्तार केलेला दिसतो, त्यापैकी काहींची नावे अशी-
पुणे जिल्ह्याच्या एकूण १३ शाखा असलेल्या भगिनी निवेदिता सहकारी बँकांच्या गेली चार वर्षे अध्यक्षा असलेल्या जयश्री काळे, जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी गेली दोन वर्षे कार्यरत असणाऱ्या स्मिता यादव, नांदेड येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी गेली ६ वर्षे असणाऱ्या संध्या कुलकर्णी. त्यांच्या या बँकेस ‘बेस्ट वूमन को-ऑपरेटिव्ह बँक’ हा अ‍ॅवार्ड मिळालेला आहे.
मी इथे फक्त १२ उच्च पदस्थ महिलांची नावे दिली, पण त्यांच्याबरोबर या विविध बँकांतील १,२०,००० महिला कर्मचारी भगिनींचाही वाटा आहे. बँकिंग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात स्त्रिया कार्यरत आहेत. खरं तर एवढय़ा मोठय़ा देशात फक्त बाराच स्त्रिया कशा? असेही मनात येते. परंतु हेही कमी नाही. कारण अर्थकारण हे क्षेत्र पुरुषांची मक्तेदारी असणारे होते, पण हळूहळू याला या स्त्रीनेतृत्वाने छेद दिला. प्रत्येक स्त्री आपापल्या परीने असे काम क रीतच आहे, पण इथे नमूद के लेल्यांच्या कामाला जिद्दी वृत्तीला, कर्तृत्वाला तोड नाही, असेच म्हणावे लागेल. अर्थकारणावर जागतिक मंदीचे सावट असताना अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत सगळ्यांनाच काम करावे लागत आहे. आपापली संस्था, रिझव्‍‌र्ह बँक आणि देशाची अर्थव्यवस्था ही उत्तम तऱ्हेने कार्यरत ठेवताना अनेक समस्यांना त्यांना समोरे जावे लागत असणारच. देशामध्ये बँकिंग वृद्धिंगत करायला भरपूर वाव आहे.
वित्तीय समावेशन आणि अर्थसाक्षर ही खरं तर आपल्या देशाची सद्य:स्थितीतील महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी सरकार आणि सर्वच बँका कामास लागलेल्या आहेत. जसजसा जोर धरला जाईल, त्या गतीने त्या व्यक्ती, समाज यांची पत सुधारेल, राहणीमान बदलेल, एकूणच उंची वाढेल.
बँकिंग क्षेत्रातील या विद्यमान स्त्रीनेतृत्वाबरोबरच यापूर्वी अनेक स्त्रियांनी दिलेले योगदानही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. काही जणी बँकिंग फायनान्स क्षेत्र सोडून कॉर्पोरेट क्षेत्रात गेल्यात, तर काही जणी निवृत्त झाल्या. त्या सर्वाचा किमान नामोल्लेख करावासा वाटतो.
मनीषा गिरोला – मॅनेजिंग डायरेक्ट ऑफ युनियन बँक ऑफ स्विर्झलड- भारतातील एक्झिक्युटिव्ह होत्या. २०११ नंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश केला. रेणू रामनाथ या कउकउक बँकेच्या एकेकाळच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होत्या त्या कॅपिटल मार्केट क्षेत्रात गेल्या. किशोरी उदेशी, श्यामला गोपीनाथ, उषा थोरात या तिघी रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर होत्या. मीरा सन्याल या चेअरपर्सन ऑफ रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड होत्या. मायक्रो फायनान्समध्ये काम करण्यासाठी तसेच राजकारण, समाजकारण यामध्ये रुची असल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात खूप काम करीत आहेत. ललिता गुप्ते या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या.
तर्जना वकिला (१९९६) या एक्झिम बँकेच्या चेअरपर्सन होत्या. नूपुर मित्रा या देना बँकेच्या अध्यक्ष- व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत होत्या.
ही यादी अशीच यापुढेही वाढत जाणार आहे याबद्दल मला खात्री आहे. ही आपली स्त्री शक्ती आहे आणि त्यात संपूर्ण भारतभर प्रत्येक क्षेत्रात प्रतिदिनी वृद्धीवाढ होणार हे निश्चित आहे.    
vandana10d@yahoo.co.in

Artificial General Intelligence (AGI)
AI आणि AGI मध्ये काय आहे फरक? लोकांना या नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते?
women employees, India centers,
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील केंद्रांत ५ लाख स्त्री कर्मचारी, ‘एग्झिक्युटिव्ह’ उच्चपदस्थ मात्र केवळ ६.७ टक्के
Why was Harvey Weinstein conviction overturned in the MeToo case
#MeToo प्रकरणातील अत्याचारी हार्वे वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली? चळवळीला धक्का बसणार?
sculpture, women, sculpture field,
शिल्पकर्ती!