News Flash

उन्हाळ्यावर उपाय

* घरातून बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे. * उन्हातून आल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून मगच सनस्क्रीन क्रीम लावावे.

| March 14, 2015 01:01 am

* घरातून बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे.

* उन्हातून आल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून मगच सनस्क्रीन क्रीम लावावे.
* उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेसाठी काकडी, बटाटा, चंदन पूड वा बदाम याचा लेप लावावा.
* चेहऱ्याबरोबर हाताचीही काळजी घ्यावी. हाताला अर्धा तास लिंबाचा रस लावून ठेवावा. नंतर धुवून कोरडे करून त्यावर मॉइश्चरायजर लावावे. (दही, टोमॅटो व बटाटा याचाही वापर करता येईल.)
* रस्त्यावरून चालताना सावलीतून जाण्याचा प्रयत्न करावा.
* टिफिन व्यतिरिक्तडब्यात काकडी, गाजर किंवा संत्र्याच्या फोडी, द्राक्षे, कलिंगड, केळे व इतर मोसमी फळे अवश्य घ्यावीत.
* अंगाचा दाह होतो अशा वेळी किलगडाच्या सालीच्या पांढऱ्या भागाचा लेप लावावा.
* स्नानानंतर काखेत किंवा घाम येणाऱ्या इतर ठिकाणी तुरटीचे चूर्ण लावावे.
* लहान मुलांच्या घामोळ्यावर चंदनाची पावडर किंवा दुर्वाचा रस लावावा.
* झोपण्यापूर्वी डोळ्यांवर थंड दुधाच्या घडय़ा ठेवाव्यात म्हणजे डोळ्यांची आग कमी होईल.
* शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे कोरडेपणा येतो. त्यासाठी आहारात दूध, लोणी व तूप याचा वापर करावा.
* शरीराला थंडावा मिळावा यासाठी स्वच्छ हवा घ्यावी. सकाळी उठल्यावर सुखासनात बसावे. शीळ वाजवतो तसा ओठांचा चंबू करून ताजी हवा घेता येईल तेवढी भरून घ्यावी, तोंड बंद करावे आणि नाकाने श्वास सोडावा. असे पाच मिनिटे करावे.
संकलन : उषा वसंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 1:01 am

Web Title: summer tips
टॅग : Lifestyle
Next Stories
1 करून बघावे असे काही
2 करून बघावे असे काही
3 करून बघावे असे काही
Just Now!
X