आपल्या आजूबाजूला असणारे आजी-आजोबा हे लहान मुलांपेक्षा वेगळे आहेत का? दोघांमध्ये किती साधम्र्य आहे. म्हणूनच जसे लहान मुलांच्या आहाराविषयी आपण जागरूक असतो तसेच आजी-आजोबांसाठी जागरूक राहायला हवे. त्यांच्यासाठी काही जरुरीची पोषक घटकं : कॅलरीज, कॅल्शियम, प्रथिने, लोह, जस्त, जीवनसत्त्व.
   अतिस्थूलता किंवा कृशता दोन्ही आरोग्यासाठी हानिकारकच. दोन्ही परिस्थितीमध्ये अशक्तपणा असतोच, कारण कॅलरीज आणि प्रथिनांची कमतरता. कॅलरीजची आवश्यकता वयाप्रमाणे कमी होते, कारण चयापचय क्रिया मंदावलेली असते आणि शारीरिक हालचाल कमी झालेली असते. पण जेवढा आहार असेल तेवढा प्रथिनयुक्त आणि जीवनसत्त्वाने परिपूर्ण असेल तर अशक्तपणा जाणवणार नाही. गुडघेदुखी किंवा मधुमेह-हृदयरोग वगरे आजारांसाठी डॉक्टर्स वजन कमी करायला सांगतात पण कमी झालेला आहार अजून कमी करणे आणि रोज एक एक तास चालणे शक्य नाही तर काय करायचे? कॅ लरीजचे संतुलन आणि मितआहार पण जीवनसत्त्व, प्रथिनयुक्त आहार आणि शरीर साथ देईल त्याप्रमाणे शरीराची हालचाल हा त्यावर उपाय!
 कृश व्यक्तींसाठी- सुका मेवा, गाईचे दूध, तूप, ज्वारी-बाजरीसारखे धान्य, फळांचे रस, बटाटे, मका, रताळी, मटार यांसारख्या स्टार्चयुक्त भाज्या, षड्रसयुक्त आहार – कारण जीभ आणि नाक या दोन्ही अवयवांची संवेदना कमी झालेली असते. कृश व्यक्तींसाठी- सुका मेवा, गाईचे दूध, तूप, ज्वारी-बाजरीसारखे  धान्य, फळांचे रस, बटाटे, मका, रताळी, मटार यांसारख्या स्टार्चयुक्त भाज्या. लठ्ठ व्यक्तींसाठी : किसलेल्या कोिशबिरी, भाज्यांचे सुप्स, काटवणी, लाह्या, उकड, कमी तूप-तेलाचे पदार्थ, फुलके, पातळ आमटी, ताक वगरे पदार्थ

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?