छोटय़ांकडून शिकण्यासारखं काय होतं?.. त्यांच्याकडे होती सुंदर निरागसता! लहान मुलांची निरागसता अज्ञानातून आलेली नसते, तर ती शुद्धतेतून आलेली असते. आपणही जगात वावरताना शरीर, मन आणि बुद्धी ही तीन ‘उपकरणं’ वापरतो. ती जर शुद्ध असतील तर आपले व्यवहारही आनंददायी होतील आणि आयुष्यात जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर निरागसतेइतकी कमीतकमी रिस्क असलेली आणि जास्तीत जास्त रिटर्न्‍स देणारी दुसरी गोष्ट नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सूर निरागस हो’ या गाण्याने सुरुवात आणि शेवट होणारा ‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट पहिला आणि ‘सूर निरागस हो’ हे तीनही शब्द मनात घुसले आणि डोळ्यासमोर आलं एक लहानसं बाळ. लहान बाळाचं असणं, त्याचं हसणं, डोळ्यात पाणी आणून आणि ओठ दुमडून रडणं असंच निरागस असतं. म्हणूनच आपण त्याच्याकडे लगेच आकर्षित होतो. त्याच्या डोळ्यातून, चेहऱ्यातून किंबहुना देहाच्या सर्व हालचालींतच निरागसता असते. हो, त्याला कोणत्याच गोष्टीचं लपवणं किंवा प्रदर्शन करायचं नसतं ना! अशीच निरागसता अनुभवण्याची गोऽऽऽड संधी मला काही काळापूर्वी मिळाली. माझ्या मनात तो अनुभव मी जपून ठेवला आहे.

मराठीतील सर्व जगू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is the innocence of childhood
First published on: 22-10-2016 at 05:30 IST