डॉ.  रोहिणी पटवर्धन – rohinipatwardhan@gmail.com

गेल्या काही दिवसांत वृद्धांच्या सहजीवनाविषयी अनेकांबरोबर चर्चा झाली, तसं आयुष्य जगत असणाऱ्या काही जोडप्यांशी प्रत्यक्ष बोलण्याचीही संधी मिळाली. सध्याच्या काळात हा प्रश्न प्रकर्षांने का समोर येतो आहे, याचा विचार करता काही गोष्टी जाणवतात. आताचा काळ हा नातेसंबंध विरळ झाल्याचा, हे खरेच; पण गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ‘करोना’ने आपले आयुष्यच बदलून टाकले आहे, हा पैलूही विचारात घ्यावासा वाटतो. आपल्या मेंदूतली पूर्वग्रहांची अनेक समीकरणे या ताज्या मानसिक अवस्थेत बदलू लागलेली असताना, वृद्धांचा एकाकीपणा आणि त्यांच्या सहजीवनाकडे समाज अधिक खुल्या दृष्टीने पाहू शके ल का?..

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

सहज म्हणून एखादे पुस्तक उघडावे आणि विचारांना वेगळी दिशा देणारे काही तरी गवसावे, तसे गेले काही दिवस घडत आहे. उतारवयातील सोबतीची गरज आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ अर्थात सहजीवन या विषयावरील लेखाची ‘चतुरंग’कडून विचारणा झाली असतानाच आपल्याही मनाच्या एका कोपऱ्यात त्या विषयाची नोंद घेतली गेली आहे हे लक्षात आलं आणि त्याच वेळी प्रत्यक्षातही मला अशा काही जोडप्यांशी बोलण्याची संधी मिळाली. मी वृद्धांच्या समस्यांबाबत काम करत असल्याचे माहीत असल्यामुळे असेल, अलिकडेच वृद्धांच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या बाबतीत विचारणा करणारे काही फोन आले. ‘तुमच्या वृद्ध सहनिवासात राहाण्यासाठीच्या अटी काय आहेत?’ हा प्रश्न माझ्यासारखीला अगदी नेहमीचा; पण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असणाऱ्या जोडप्याला तुमच्या वृद्ध सहनिवासात  राहाण्याची परवानगी आहे का?’ अशा प्रश्नाची मी कधी अपेक्षाच केली नव्हती!

अनपेक्षितपणे आलेल्या या प्रश्नाने मी चक्रावले. थोडे थांबून मी म्हटले, की विचार करून सांगते. फोन करणाऱ्या व्यक्तीचे वय विचारले, तर ८०. खरेच ते ‘लिव्ह इन’मध्ये राहात असतील? या वयात त्याची गरज का वाटली असेल? त्यांना मुलेबाळे आहेत का? असतील तर त्यांना  काय वाटत असेल आपल्या आईवडिलांबद्दल? त्यांनी मला स्पष्ट सांगितले, तसे ते मुलांशी बोलले असतील का? समाज त्यांना नावे ठेवत असेल का? त्या वेळेला ते कसे निभावत असतील? नवरा आणि बायको यासारख्या नात्यामध्ये बसेल असे ते वागत असतील, की त्यांच्यात काही वेगळी समजूत असेल? नक्की त्या दोघांचे जमत असेल, की पैशांसाठी तर हे काही केले नसेल? दोघांना एकमेकांची गरज नक्की कशासाठी वाटत असेल? असे प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! उलटसुलट अनेक दिशांनी धावणारे. ज्येष्ठांच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आदी प्रश्नांचा दोन दशकांपेक्षा अधिक काळ अभ्यास करत असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनात इतके प्रश्न येत असतील, तर सर्वसामान्य समजुती आणि विचारांच्या चौकटीत असणाऱ्यांना हे किती वेगळं वाटत असेल?..  मनातलं हे सगळं आंदोलन मागे ठेवून मी त्यांच्याविषयी आणखी विचार करत गेले.

त्यांच्या या मागणीला पाश्र्वभूमी होतीच. काही वर्षांपूर्वीची गोष्ट.  वृत्तपत्रात जाहिरात आली होती, ‘कंपॅनियन पाहिजे’. जाहिरात देणारी व्यक्ती प्रतिष्ठित, प्रस्थापित असूनही जाहिरात दिली होती. पत्नीचे निधन झालेले. व्यवसाय उत्तम होता. इतका, की वेळ पुरत नव्हता. मुले ज्याच्या त्याच्या संसारात गुरफटलेली. अनादर नाही, पण फार काही प्रेम नाही. पैसा, आरोग्य, सगळं उत्तम; पण एकटेपणा म्हणजे काय असतं ते तेव्हाच समजतं. अशा वेळी जर समजून घेणारे माणूस जवळ असेल, तर जगण्याला काही तरी अर्थ वाटेल, या भावनेतून त्यांनी ती जाहिरात दिली होती.  या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून ज्या व्यक्ती भेटायला आल्या, त्यासुद्धा बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या, निरोगी होत्या. त्यांपैकी एक बाई- लग्न झालेलं, पण नवऱ्याला संसारात फारसा रस नव्हताच. नोकरी करत मुलाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला, पण तोही अयशस्वी. उमेदीची र्वष सरलेली. मन मोकळे करायला, आजूबाजूला बोलायला, विचारपूस करायला कु णी नाही. पन्नास-पंचावन्नच्या उंबरठय़ावर असतानाही आयुष्यात न मिळालेल्या गोष्टी खूप असलेली आणि आता पुढचे आयुष्य कसे जाईल अशी चिंता जरी नसली, तरी आयुष्य निरस वाटत असलेली स्त्री होती. एकत्र राहायचा निर्णय घेतल्यावर त्या दोघांचीही काही र्वष  चांगली गेली, असे ते दोघेही म्हणाले. वयोमानाप्रमाणे त्यातल्या पुरुषाला काही प्रमाणात परावलंबित्व आल्यावर त्याची सेवा करायला तिची ना नव्हती, पण त्यालाच असे वाटले, की आपल्या सेवेमध्ये तिने स्वत:ला गुंतवून घेऊ नये. त्याप्रमाणे परस्परसंमतीने ते दोघे पुन्हा वेगळे झाले. दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहात आहेत, पण रोज तासन्तास फोनवर गप्पा मारतात. आता तिलाच असे वाटते की, अशा वेळी आपण जवळ असायला हवे. यासाठी वृद्धाश्रमामध्ये राहाता येईल का, याची त्यांनी चौकशी केली होती.

दुसऱ्या एका व्यक्तीची कथा अगदी वेगळी. आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर ‘लिव्ह इन रिलेशन’ जीवनाचा स्वीकार करून एकत्र राहिलेल्या दोघांपैकी स्त्रीने त्याचा विश्वास संपादन करून, त्याचा व्यवसाय स्वत:च्या नावावर करून ती सरळ निघून गेली होती. याबद्दल तक्रार करणाऱ्या त्या व्यक्तीच्या मुलावर पोलिसांपर्यंत जायची वेळ आणली. आणि आता हा माणूस एकटाच आहे. जवळ ना पैसे, ना सोबत! त्याच्या बहिणीचा मला फोन आला, की त्यांना तुमच्या वृद्ध सहनिवासात  ठेवायचे आहे.  त्यांचा सर्व खर्च मी करेन. तिसरा फोन आला की, ‘‘तुम्ही वृद्धांसाठी काम करता, तर तुमच्या माहितीतील एखादी स्त्री सोबत म्हणून माझ्याबरोबर राहील अशी आहे का? पैशांची काळजी नाही. माझी प्रकृती उत्तम आहे. बायको वारली, मुले अमेरिकेत आहेत. एकटे वाटते. तिची पूर्ण जबाबदारी मी शेवटपर्यंत घेईन.’’

आत्ताच हा विषय अशा पद्धतीने का यावा याचा विचार करत होते.  मी खात्रीने नाही म्हणू शकणार, पण कदाचित ‘करोना’ने माणसांच्या सहवासासाठीच्या गरजा जास्त प्रकर्षांने जाणवायला लागलेल्या आहेत. काळ झपाटय़ाने बदलत आहे, तो काही आज बदलत नाही. मग सध्या याला काही तरी कंगोरे ‘करोना’मुळे जाणवायला लागले आहेत का? आपले घर आपल्या प्रकृतीपेक्षाही जास्त महत्त्वाचे मानणाऱ्या आणि त्रास होत असतानाही वृद्धनिवासाचा विचारसुद्धा मनात न आणणाऱ्या साठीतल्या ज्येष्ठांना सहवासाची, माणसाच्या मदतीच्या गरजेची जाणीव कदाचित गेल्या काही महिन्यांत प्रकर्षांने निर्माण झाली असावी. खरे तर सगळ्या प्रकारच्या माणसांना ही जाणीव झाली असावी असे वाटते. उदाहरणच द्यायचे झाले, तर एखाद्या अगदी शंभर टक्के  गृहिणी असलेल्या व्यक्तीशी मी सहजीवन या विषयाबद्दल या पूर्वी बोलले असते, तर तिची प्रतिक्रिया बहुधा नकारात्मक आली असती; पण आता तीही सहजपणे म्हणाली, ‘‘माणसाला वय वाढल्यावर दुसरे काही नको असते. आपला विचार करणारी, आपल्याला समजून घेणारी माणसे हवी असतात.’’

मग मी सध्या ४०, ४५, ५० या वयोगटात असणाऱ्या काही व्यक्तींशी  बोलले. तेपण या विचारांशी अगदी मोकळेपणाने सहमत झालेले दिसले. तो त्यांच्या वयानुसार असणारा विचार असेल; पण तो मला इथे महत्त्वाचा वाटतो, कारण दांपत्यजीवनाची गरज जरी उतारवयात वाटत असली, तरी तो निर्णय घ्यावा किंवा नाही यामध्ये  त्यांच्या मुलांची भूमिका, त्यांची संमती फार महत्त्वाची असते. एकटेपणा या विषयावर जे काही संशोधन झाले आहे, त्यामध्ये निघालेला निष्कर्ष असा, की गृहिणींना एकटेपणा जास्त जाणवतो. कारण शोधायला गेलो, तर लक्षात येते, की गृहिणींनी कधी स्वत:चा विचारच केलेला नसतो. त्यांचे जगणे कायम इतरांच्या संदर्भात, इतरांसाठी असते. ते ‘इतर’ कमी झाले, की एकदम पोकळी निर्माण होते. तिने आयुष्यभर  स्वत:चा विचार न करता केलेल्या कष्टांची जाणीव ठेवून तिला येणारा एकटेपणा दूर करण्याची शक्यता मुलांकडून जवळजवळ नसतेच. म्हणूनच माणूस म्हणून जगताना जे पारखे झाले होते, ते शोधण्याचा प्रयत्न करताना जे एकत्र येतात, दांपत्यजीवनाचा स्वीकार करतात, ते आपण समजू शकतो की नाही, हा खरा प्रश्न आहे.

समजून घेण्यात मुख्य अडचण जर कोणती असेल, तर आपल्यावरच्या संस्कारांची. पण हे संस्कार आपल्यावर कधी झाले? किमान पन्नास-साठ वर्षांपूर्वी! तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. एकत्र कुटुंब होते. मुख्य म्हणजे मुले-नातवंडे  जवळ होती आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट अशी, की आयुष्य काही फार मोठे नव्हते. साठीनंतर दहा-पंधरा वर्षांचे आयुष्य होते. म्हणजे सगळे कसे मर्यादित होते. आता आपल्यापैकी अनेकांना जवळजवळ ९० वर्षे तरी जगावे लागणार आहे. म्हणजे साठी पार  झालेल्या व्यक्तींना जवळपास ३० वर्षे काढायची आहेत.

ती कशी काढणार?  मानसिकदृष्टय़ा एकटेपणाची भावना सगळ्याच गोष्टींवर परिणाम करत असते. अशा वेळी कु णाचा तरी समंजस आधार हवा असतो; पण तरुण पिढीला याची जाणीव होत नाही. लोक काय म्हणतील? आपले ‘स्टेटस’ आणि मुख्य म्हणजे आपला आर्थिक तोटा होईल किंवा आपल्याला त्रास होईल, असे विचार जास्त आढळतात. साहजिकच वृद्ध व्यक्ती अधिकच एकाकी होते. त्यातून विस्मरणासारख्या गंभीर आजाराला सामोरे जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सध्याच्या बदलत्या, नातेसंबंध विरळ झालेल्या परिस्थितीमध्ये मुलाबाळांची साथ नसलेल्या ज्येष्ठांच्या परिस्थितीबद्दल अधिक विचार होणे प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक घटकाकडून अपेक्षित आहे.

आपला जोडीदार आपल्याबरोबर जास्तीत जास्त काळ असावा, आयुष्याच्या उत्तरार्धातही आपले नाते सहज समजुतीचे, आनंदाचे असावे, असे वाटणे स्वाभाविक आहेच; परंतु अनेकदा ते शक्य होत नाही आणि मग २०-३० वर्षे एकटय़ाने काढण्यापेक्षा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा विचार के ला जात असावा. मात्र त्यातही अनेक खाचखळगे असू शकतात, त्यामुळे ज्या व्यक्तीला हा विचार प्रत्यक्षात आणायचा आहे त्या व्यक्तीमध्ये ते सर्व रेटून नेण्याची इच्छा हवी हे तर खरंच, पण धमकही पाहिजे.  ही संकल्पना थेटपणे त्याचे परिणाम लक्षात घेऊन समजून उमजून प्रत्यक्षात आणायची आहे.  इतर पर्यायांपेक्षा हा  पर्याय स्वीकारायचा असेल तर त्याचीही एक किंमत आहे, ती मोजायची तयारी ठेवून किं वा कठोरपणे ती तपासून पाहायला हवी. त्यासाठी प्रथम स्वत:ची आर्थिक क्षमता नीट जोखली पाहिजे. त्यातून दुसऱ्या व्यक्तीला काही मिळणार आहे किंवा नाही याची स्पष्ट कल्पना देऊनच पुढचे पाऊल टाकले पाहिजे. या वयात जोडीदार ही व्यक्ती बायकोची परंपरागत भूमिका करणार नाही, याचंही भान सुरुवातीपासूनच असायला हवं, कारण हा धाडसी निर्णय घेणारी म्हणजे ती नक्कीच वेगळी असणार .

सहजीवनाचा निर्णय घेणे आणि प्रत्यक्षात येणे यात खूप अंतर आहे. या अंतराचा योग्य विचार दोन्हीही व्यक्तींनी करणे गरजेचे आहे. खरं तर अशा प्रकारच्या संबंधांची आपल्या समाजाला अजून सवय नाही हे सत्य आहे. आपणही या सहजीवनाला सुरुवात करण्यापूर्वी मला कायमच कोणी सोबतीला हवे आहे का? याचा विचार जरूर करावा. नाही तर मधूनमधून एकत्र राहणे योग्य ठरू शकते, कारण

कु णाला ना कु णाला शेवटी एकटे  राहायचे असतेच.  आजारपणाची भीती वाटत असेल किंवा परावलंबित्वाची भीती वाटत असेल तर त्यासाठी कायम एकत्र राहायला हवे असे नाही. आजारपणाच्या संदर्भात वैद्यकीय  इच्छापत्राचा जरूर विचार करावा. कोणतीही नवीन वाट स्वीकारताना अनेक आव्हाने उभी राहतातच, त्यातून कुठे कसे पोहोचू याची शंभर टक्के   खात्री देता येत नाही. सहजीवन ही गरज आहे; पण ती पूर्ण करण्याकरिता आवश्यक सावधपणा आणि  विचारात स्पष्टता असणे आवश्यक आहे.

आजच्या  तरुणाईने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची संकल्पना फार पटकन स्वीकारली, कारण त्यात खूप सोय आणि स्वातंत्र्य आहे.  त्या तरुणांच्या आईवडिलांनाही ते स्वीकारावं लागलं. उतारवयातील ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मात्र तरुणाईपेक्षा अगदी उलट आहे. ते एक बंधन आहे, ती जबाबदारी आहे आणि निदान आता तरी एक प्रकारचे धाडस आहे. ते ज्या व्यक्तीला ‘जमेल तोच रमेल’.

माझ्या डोक्याला ज्येष्ठ कल्याणाची अ‍ॅंटीना आहे, असं मला वाटतं. तेथून आलेले संदेश आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा माझा प्रयत्न.. त्याचा योग्य विचार व्हावा, हीच इच्छा.