|| सोनाली नवांगुळ

ती दिसतच नाही पंचविशीची. केस अगदी बारीक कापलेले. डोळ्यांकडेच आधी लक्ष जातं इतके ते छान टपोरे नि काळेभोर. रंग गोराच. मनाचं शरीर पूर्ण वाढलेलं, पण खरं शरीर? ते शरीर सगळं आखडलेलं. कशाही साध्या गोष्टीनंही चेतली की तिची थरथर स्थिर व्हायला पाच-सात मिनिटं लागणार..

scrub typhus introduction diagnosis of scrub typhus threat of scrub typhus
Health Special: दुर्लक्षित पण महत्त्वाचा आजार ‘स्क्रब टायफस’ आहे तरी काय? उपचार काय कराल? 
itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
How do you make sure there is no worm in a cauliflower
फक्त काही सेंकद फुलकोबी गॅसवर ठेवा, झटक्यात बाहेर येईल अळी किंवा किडे; पाहा भन्नाट Kitchen Jugaad

तिला लग्न करायचंय, पण तहान लागली म्हणून पाणी पाजायचं तर साधं भांडभर पाणी तिच्या पाणी पिण्याच्या असोशीमुळे सुटलेल्या थरथरीतून चार घोटच तोंडात जातं. उभी तर राहूच शकत नाही ती. खूप परिश्रम करत जमिनीवरून सरकते फार तर. अन्न खाताना सगळीकडे सांडतं. तोंडाच्या कडेला लागलेलं शितबित तिला कळतंही नाही. लक्षात खूप राहतं. त्यामुळे चौकशा करत असते. – मात्र वयानं वाढत राहताना ‘विशिष्ट’ काळात बहरलेला, तिला बदलणारा ऋतू? त्याचं ती काय करू शकणार? फार तर स्वत:कडं लक्ष वेधून घेते, नाना क्लृप्त्या करून. कधी कधी आवरत नाही तेव्हा उचलण्यासाठी विशिष्टच मुलांना मदतीला हाक मारते. त्या वेळी कुणी स्त्री मदतनीस नको असते तिला. एकदा तर तिनं तिच्याहून लहान मुलाच्या नाजूक जागी नुकसान पोहोचवलं. तो लहान. रड रड रडला. ती भेदरली. खरं तर तिला नुकसान पोहोचवायचं नव्हतं. पण तिच्या शारीरिक स्थितीनं दगा दिला. मनानं शरीरात मांडलेला दंगा सांगण्यासाठी तिच्याकडे एक्स्प्रेशन नाही. ज्या ज्या मुलांना मदतीला हाका मारल्या किंवा ज्याला तिच्यामुळं त्रास झाला असे एकेक सहजसाधे मित्र तिनं गमावलेत हे तिला कळत होतं, पण वळत नव्हतं. एक जाणता पुरुष मात्र तिची अबोलपणे काळजी घेत होता. तिच्या वागण्याची थेट शिक्षा न करण्याचा समंजस निर्णय घेत होता. भारतासारख्या देशात ‘ही स्थिती’ समजून घेत तिला निरनिराळ्या गोष्टींकडे वळवणं नि जरूर पडेल तेव्हा तात्पुरता जागापालट करणं इतकंच त्याच्या हातात होतं. पण बडबड टाळून तो हे समजून करत होता यानं माझे डोळे लालसर होत होते. आपल्या धडधाकट शरीर व मनानुसार (?) स्वत:ची लैंगिकता मान्य करणं हे जिथं अजूनही कठीण जातं अनेकांना तिथं एखादा पुरुष म्हणतो, ती करते ते चूक कसं म्हणावं? तिची भूक गैर कशी असू शकेल? ती सबळ असती तर तिनं ती कशीही, कुठंही तिच्या तिच्या स्टेटसनुसार भागवली असतीच! मी पटकन तिला आंबा हवा म्हणून तो देऊ शकतो तसं हे नाही पुरवू शकत, पण चुकीच्या पद्धतीनं बभ्रा न करता समजून तर घेऊ शकतो! तेच महत्त्वाचं.. – खरंचंय की या ‘पुरुषा’चं म्हणणं. लोक असं काही बघितलं, अनुभवलं, ऐकलं की घाबरतातच नि विकृत म्हणत काही लोकांना कायमचं वेगळ्या ग्रहावर बंदिस्त करून टाकतात. निसर्ग यांना त्यांना वेगवेगळं नाही वागवत तर माणसांनी तरी माणसांना का वागवावं हा प्रश्न कुणी कुणाला विचारावा?

मला आठवतंय की, २०-२५ वर्षांपूर्वी असाच एक मुलगा ट्रायसिकलवरून फिरायचा. तो नक्की काय करायचा ठाऊक नाही, पण चालणं ही गोष्ट वगळता अंगापिंडानं मजबूत होता. त्याची शारीरिक व मानसिक अडचण काय असू शकते याचा विचार त्या काळात डोक्यात येणं शक्य नव्हतं, पण काही बायाबाप्ये आपसात बोलताना म्हणायचे की बाईमाणसाकडं पाहायची त्याची नजर चांगली नाही. तो वळून बघतो नि एकदा टक लावली की हलवत नाही. या थेट नजरेनं म्हणे बायका अस्वस्थ होतात. काही अंग चोरून झपझप निघून जातात त्याच्यासमोरून नि काही घाणघाण शिव्या घालतात. तो वेगळ्या धर्माचा असल्यानं धाक होता नाही तर त्याच्यावर हात उचलायलाही कमी नसतं केलं कुणी! भर चौकात राहत असून तो मुलगा एकदम एकटा पडत गेला. मुलगी असता तर त्याचे काय हाल झाले असते यानं आता विचार करताना आणखीच भीती वाटते. ‘मनाचं शरीर वाढलेल्या मुली’ला समजून घेणारा पुरुष भेटण्याचं त्यामुळंच तर जास्त समाधान वाटतं आज. नजरेची ओळख आणि साधासा स्पर्श ही आपलं माणूसपण मान्य असल्याची पावती असू शकते हे आज अनेक पुरुषांना कळू लागलंय ही मोठीच गोष्ट!

काही वर्षांपूर्वी ती मला म्हणालेली, ‘‘तू काय बाईऽऽ बोलकी, स्मार्ट! आमचं तसं नाही. संधिवातानं आमचं दिसणं गळाठून गेलेलं. त्वचेचा रंग काही कामाचा नसतो..’’ मला कोणी ‘तसं’ बघत नाही याचा आनंद वाटावा की दु:ख कळत नाही. पण मान्य करू? – कळतं तेव्हा दु:खच वाटतं. – तिला ताई किंवा मॅडम असं न संबोधणारा, एखादं लाडाचं नाव देऊन हाक मारणारा, केस विस्कटून टाकणारा नि ती व्हीलचेअरवर असताना मागून येऊन तिचे डोळे झाकणारा एखादा पुरुष मित्र म्हणून मिळावा इतकीच तर तिची अपेक्षा होती. – मात्र ती अशा पुरुषांच्या व स्त्रियांच्या जगात होती जिथं एकमेकांकडं फार बघितलं तरी ‘नकोसा वास’ श्वास घुसमटून टाकायचा. शारीर सुखाच्या ठरीव संकल्पनांपलीकडं काही शारीर सुखं माणसांच्या इच्छांच्या प्रदेशात असतात हे समजून घ्यायला खरंच इतकं अवघड जावं?

एकीचं शरीर असं नि इतकं नाजूक की थोडय़ा श्रमानं हाडांना केसांइतक्या जाडीचे तडे जातील.. ती देखणी, बुद्धिमान, कर्तृत्ववान. तिला भयंकर जपायचे घरचे लोक. तिचा शब्द कधी खाली पडू दिला नाही कुणी. तिला स्पर्शाची खूप ओढ, पण घरचे काळजीवाहक सतत आसपास. ती नि तिचा मित्र निर्हेतुक गप्पा मारत असतानासुद्धा सतत येऊन, पाणी हवं का? चहा देऊ का? डोक्याखालची उशी सरळ करू का नि गोळ्या तर विसरली नाहीस ना? असं विचारून एकांताचा हक्कही न देणारे. तिचा मित्र कसनुसा व्हायचा. त्याला वाटायचं की आपल्या या अपरंपार चांगल्या मैत्रिणीला खूप स्वच्छपणे स्पर्श करावा नि डोक्यावर एक हलकंसं चुंबन घ्यावं! ते कधी शक्य नव्हतं.. तेव्हा तो तिला भेटायचाच बंद झाला. ती अजूनही दुखून आहे की त्यानं एकांतावर घाला घालायला टपलेल्यांना शरण जायला नको होतं! त्यानं किमान तिला हे बोलायला हवं होतं. त्याच्या उबदार बोलण्यानं ती कल्पनेनंच त्याच्या न घेतलेल्या पुढाकाराला खरं मानत राहिली असती. किमान बोलायला हवं होतं!

– आणि दुसरीकडे अपंगत्वाच्या तुरुंगात अडकलेलीय असं वाटणारी आपली मैत्रीण मनानं मोकळी, मुक्त व शहाणी आहे हे माहिती असणारा एखादा मित्र तिला सांगतो, ‘काहीही वाटलं तर सांग.. मनाशी शारीर भावनेविषयी काही उसळलं तर ते दाबून बंद करू नकोस.. मी ऐकेन. गैरसमज करून घेणार नाही.’ असं म्हणताना उगीच गंभीर रंग यायला नको म्हणून पुढे खिदळत म्हणतो, ‘‘तशी तू बरीयेस दिसायला. बुद्धीनंही. तेव्हा ‘तशी’ हाक मारलीस तरी येईनच बरं का! दाताबिता म्हणून नाही, तुझा चाहता म्हणून!’’

कमरेखालचं शरीर गमावलेला एक मित्र आपल्या शरीरानं सुदृढ बायकोला तिच्या सुखाच्या कल्पना विचारून खूश ठेवायला धडपडतो, तिला मुद्दाम हवापालट म्हणून फिरायला पाठवतो हे दृश्य मला खूप दिलासा देऊन गेलेलं.. कारण वेगवेगळ्या अपघांतात व्हीलचेअर नशिबी आलेल्या काही प्रौढ पुरुषांनी असुरक्षिततेपोटी, संशयाचं भूत मानेवर बसवून बायकांचं काय नि किती बुजगावणं केलं ते मी पाहिलेलं होतं. अपंग झालेल्या स्त्रीला (काही सन्माननीय अपवाद) पुरुष पटकन सोडतो पण बाई वेगवेगळ्या कारणांमुळं तसं करत नाही याचा फायदा घेणारी ही ‘माणसं’!

स्पर्श नि नजर यांची शहाणी  सोबत जितकी मोलाची तितकंच हेही. – घर बदलताना एक मित्र मदतीला आलेला. नको असणारं सामान त्याच्या मदतीनं झटपट लॉफ्टवर पॅकबंद करून ठेवलेलं. आम्ही किती शोधलं, सापडलं नाही. त्या मित्राला बोलावलं. स्वयंपाकघरातल्या लॉफ्टकडे बोट दाखवत म्हटलं, ‘‘बघ, मिळतंय का ‘अमुक’?’’ त्यानं स्टूल घेतलं नि बेडरूमच्या लॉफ्टवरचं नेमकं खोकं काढलं नि म्हणाला,

‘‘ हे घे!’’

काही गोष्टी आपण कितीही शोधल्या तरी ‘त्यानं’च शोधून द्याव्या लागतात. ते खूप सहज असू शकतं. तिनं मानलं तर नि त्यानंही मानलं तर!

sonali.navangul@gmail.com