हे ‘तो’चं अवसान तिच्यात कधी शिरलं? सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसनं बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच! त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं की, मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त.

माणसांचे निरीक्षण करावे. त्यांच्या वरवर सर्वसामान्य वाटणाऱ्या शरीरातील आणि आयुष्यातील विलक्षण गोष्टी धुंडाळाव्या. त्यांच्या आनुवंशिक प्रेरणा, आयुष्यातील संघर्ष आणि त्यातून आकाराला येणारी प्रकृती अभ्यासावी, अशी काही भाबडी उद्दिष्टं मनात ठेवून तिनं डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता.

article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
Chanakya Niti These 5 things men should never tell anyone
Chanakya Niti : पुरुषांनी या ५ गोष्टी अजिबात कोणालाही सांगू नयेत, नाहीतर आयुष्यभर लोक तुमच्यावर हसतील

वयाच्या सतराव्या वर्षी तिने आंतरबाह्य़ पाहिलेला पहिला पुरुष होता देवदास. अर्थात ‘देवदास’ हे तिनं त्याला दिलेलं नाव होतं. कोणीही वारसदार न सापडल्यामुळे मेडिकल कॉलेजच्या शवागारात भरती झालेला असा तो देवदास. देवदासच्या त्वचेतून खोल शिरत त्याच्या शारीरिक संरचनेचा अभ्यास करताना, पुरुषाच्या शरीराविषयीचं तिचं कुतूहल नाहीसं झालं; पण देवदासचा मेंदू हातात घेतल्यावर ती अस्वस्थ होत असे. देवदासच्या आठवणी, भावना, वासना, पुरुषार्थ किंवा स्वप्नं या साऱ्याची हार्ड-डिस्क हातात असूनही त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञच आहोत, या विचारानं थेट कॉलेजच्या शेवटपर्यंत तिचा पिच्छा पुरवला.

जिवंत माणसांचं विश्लेषण करण्यात जास्त मजा होती. एकदा एक मिस्कील प्राध्यापक वर्गात ‘सेक्स’ ही संकल्पना समजावताना म्हणाले होते, ‘‘मॅमल्स हॅव ओन्ली वन सेक्स. दे आर आयदर फिमेल्स ऑर करप्टेड फिमेल. सस्तन प्राण्यांमध्ये, ‘नर’ ही मादीची संप्रेरकांमुळे भ्रष्ट झालेली आवृत्ती आहे!’’ सगळे खूप हसले होते. सगळ्या ‘मुली’ खूप हसल्या होत्या. शेजारी बसलेल्या मित्राने लगेच कमेंट मारली होती, ‘‘चला, म्हणजे आपण दोघं बुद्धी भ्रष्ट झालेल्या स्त्रिया आहोत तर!’’ तिला आवडलं होतं ते.

इंटर्नशिपच्या वर्षी कॉलेजच्या पुस्तकी जगातून ती हॉस्पिटलच्या वॉर्डातल्या माणसांमध्ये आली. व्हेन्टिलेटरची सुविधा नसलेल्या नवजात शिशू विभागात तिची पोस्टिंग होती, त्या वेळी रात्र रात्र ती आणि इतर इंटर्न्‍स एखाद्या मशीनप्रमाणे त्या बाळांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देत बसून राहायचे. त्या एका पोस्टिंगने ‘बाप’ काय असतो याची तिला जाणीव करून दिली. किडनी खराब झाल्यामुळे शरीरभर सूज आलेल्या मुलीचा दाह कमी व्हावा म्हणून दिवसभर फुंकर घालत राहणारा ‘तो’. आपलं मूल दगावलं हे मान्य न करता तिने प्रयत्न थांबवू नयेत म्हणून गयावया करणारा ‘तो’. काही तासांच्या बाळासाठी आपलं घरदार विकायला तयार झालेला ‘तो’. डॉक्टरांनी भावनाविवश असून चालत नाही, हा अलिखित नियम तिने मोडीत काढायचा ठरवलं. इतकंच नाही तर मुलगी असूनही ‘सर्जरी’सारखं अत्यंत पुरुषी वर्चस्व असलेलं निवडलं. स्वत:ला ‘तो’ किंवा ‘ती’ अशा परंपरागत भूमिकेत ठोकून ठोकून बसवण्यापेक्षा त्याविरुद्ध बंडखोरी करण्यात जास्त थ्रिल होतं.

कुठल्याच साचेबद्ध ‘ती’ किंवा ‘तो’बद्दल तिला आकर्षण वाटलंच नाही. तिला आवडणारा ‘तो’ कधी गुलाबी ड्रेस घालून ‘शीला की जवानी’वर डान्स करण्यासाठी आसुसलेला, झोया अख्तरच्या सिनेमातला लहान मुलगा असायचा. कधी तो मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारा मित्र असायचा. पुरुषी इगो औषधापुरताही नसलेले आणि हळवेपणा दाखवायला न घाबरणारे पुरुष तिला जाम आवडायचे. आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांपेक्षा, सिनेमा आणि पुस्तकांचाच तिच्या आयुष्यावर खूप प्रभाव होता. उदाहरणार्थ, ‘बिफोर सनराइझ’ या इंग्लिश सिनेमामधल्या सेलीन (‘ती’) आणि जेसी (तो) या दोन मुख्य पात्रांप्रमाणे कुठल्याही नात्याचं लेबल न लावता एकमेकांबरोबर निवांत फिरावं, मनसोक्त बोलत राहावं आणि काही अमूर्त क्षण जगावेत ही तिची अल्टिमेट रोमँटिक फँटसी होती.

प्रेम.. लग्न.. संसार, या कुठल्याच गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, अशी तिची ठाम समजूत होती. असं असूनही या सगळ्याच गोष्टी तिच्या आयुष्यात अनपेक्षितपणे आल्या. ज्याला एका फुलाची असुरक्षितता कळते, ज्याला ज्वालामुखींना शांत ठेवायला जमतं आणि दिवसातून सत्तेचाळीस वेळा सूर्यास्त पाहायला आवडतं, असा एखादाच ‘लिट्ल प्रिन्स’ असतो. असा ‘तो’ भेटल्यावर आधीची तिची सगळी गृहीतकं ती विसरून गेली. तिच्या भावनांना, व्यक्तिमत्त्वाच्या कंगोऱ्यांना आणि विक्षिप्तपणाला त्याने कवेत घेऊन टाकले. त्यानंतर तिची असुरक्षितता, स्वतंत्र बाण्याच्या कर्तबगार स्त्रियांना जसं अधूनमधून घरगुती होण्याची लहर येते, तशी फक्त ‘चैनी’पुरती उरली.

एकदा एका समारंभात तुझ्या ‘यां’ची कुठली गोष्ट तुला सगळ्यात जास्त आवडते, असं कुणी तरी विचारलं तेव्हा ‘त्याच्या स्वभावातला सेन्सॉरशिपचा अभाव’ हे ओठांवर आलेले शब्द गिळून तिने काही तरी गुळमुळीत उत्तर दिलं. इतर पुरुषांमध्ये स्त्रियांबद्दल आढळणाऱ्या, ओनरशिप आणि सेन्सॉरशिप, या भावनांचा ‘तो’मध्ये पूर्णपणे अभाव होता. ‘तो’बद्दल आपल्याला नेमकं काय आवडतं हे काही वर्षांनी तिला अरुणा ढेरेंच्या एका कवितेत सापडलं. तिला समोर ठेवूनच ते लिहिलेलं असावं इतकं ते तिला जवळचं वाटलं.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना

त्याने कधी देऊ  पाहिले नाहीत आपले डोळे

आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात

हिंदकळणारे धुंदमदिर निळे तळे..

पुरुष- जो क्षमा करून नाही ऋणी करत;

पाठ फिरवून नाही उणी करत;

घेतो समजून, सावरतो,

आवरतो, उराशी धरतो;

आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही

आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो!

रूढार्थाने तिला तिच्या आयुष्यातल्या कुठल्याच पुरुषाशी कधीही संघर्ष करावा लागला नाही; पण तिच्या नकळत एका वेगळ्याच ‘त्याने’ तिच्या आयुष्याचा ताबा घेतला होता हे खूप उशिरा समजलं तिला. रात्री-अपरात्री हॉस्पिटलमध्ये राऊंड घेत फिरणारा, इतर ‘तो’ जागेवर नसल्यामुळे ट्रॉली ओढणारा, पेशंट उचलणारा, डार्करूममध्ये एक्स रे धुणारा आणि दारूच्या नशेत तर्र माणसाला तो सारखा हलतोय म्हणून त्याचं लक्ष विचलित करून भराभर टाके मारणारा तो! दहा तास चालणाऱ्या ऑपरेशनमध्ये लघवी करायला डिस्टर्ब झालो तर ‘अनमाचो’ दिसेल म्हणून स्वत:ला रेटणारा टफ टास्कमास्टर तो!

हे ‘तो’चं अवसान (बेअिरग) तिच्यात कधी शिरलं? सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसने बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच! त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं, की मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त. किती तरी पुरुष तिच्याबद्दल आदर दाखवायला तिला ‘सर’ म्हणायचे, कारण त्यांच्या डिक्शनरीत आदरार्थी फक्त ‘तो’च होता! कारण सर्जन फक्त ‘तो’च असतात. ती ‘तो’ नसता तर वॉर्डात इतर सगळ्या ‘तो’च्या बरोबरीने दिवसरात्र कशी राबली असती? सर्जरी रेसिडेंटच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली अंगमेहनतीची कामे  कशी केली असती?

ती असलेला ‘तो’ आठवडय़ातून एकशेवीस तास काम करायचा.

मासिक पाळी आल्यावर पोटरीत स्फोट होत असतानाही, तो ‘तो’ होता म्हणून तासन्तास उभा राहायचा.

बोलताना सगळे ‘तो’च्या चेहऱ्याकडेच पाहायचे फक्त!

तो ‘तो’ नसता तर?

‘तो’शिवाय तिचं ते खडतर ट्रेनिंग इतक्या ‘डिग्निफाइड’ पद्धतीने पूर्ण झालं नसतं कदाचित! पण ज्या समाजमान्य परंपरागत ‘तो’च्या व्याख्येचा आपण तिटकारा केला, त्याच ‘तो’च्या व्याख्येत  आपण स्वत:ला केवळ व्यावसायिक प्रतिमेसाठी अडकवून घेतलं हे एका क्षणी कळल्यावर तिला खूप हताश वाटलं. या प्रतिमेतून आपली सुटका नाहीच का? ती  विचार करत राहिली.

आपले कार्यक्षेत्र पुरुषी वर्चस्व असणारं असलं तरी आपल्या स्त्रीत्वाचा कोंडमारा होऊ द्यायचा नाही असं तिनं ठरवलंय. तिच्या सुदैवाने जगभरातील पुरुषप्रधान कार्यक्षेत्रे या स्थित्यंतरातून जात आहेत. स्वत:ची ओळख आणि कार्यशैली निर्माण करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रिया लिहित्या आणि बोलत्या झाल्या आहेत. त्याचे पडसाद साऱ्याच माध्यमांतून उमटत आहेत. सिनेमा हे तिच्या काळजाला भिडणारं माध्यम. अखेर एका सिनेमामुळेच एखाद्या उत्प्रेरकाप्रमाणे तिच्या मनातल्या परस्परविरोधाला दिशा मिळते. स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘द पोस्ट’ हा सिनेमा !

समोरच्या पडद्यावरती बोर्डरूमचा सीन सुरू आहे. अख्ख्या रूममध्ये त्या व्यवसायातले जाणकार आणि प्रतिष्ठित असे अनेक पुरुष आणि ‘मेरिल स्ट्रीप’! नवऱ्याच्या आत्महत्येनंतर अचानक वडिलोपार्जित ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची जबाबदारी तिच्यावर पडली होती, जी तिने वर्षांनुवर्षे उत्तम सांभाळूनही केवळ ती ‘ती’ असल्यामुळे तिला कुणीही गांभीर्याने घेत नाहीये. तिने कुणाचं बेअिरग घेतलंय? तिच्या नवऱ्याचं? त्याच्यासारखा होण्याचा, त्याच्या तत्त्वांना/पेपरला जपण्याचा तिचा निकराचा प्रयत्न सुरू आहेच. तिचा पेपर तिने कसा चालवावा याबद्दल रूममधले सगळे जोरदार ेंल्ल२स्र्’ंल्ल्रल्लॠ करतायत. न मागितलेले सल्ले देतायेत. ती क्षणभर बावचळते. तिची सगळी असुरक्षितता एका क्षणी तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. आता ती काय करेल? पण पुढच्याच क्षणी या साऱ्या पुरुषी वर्तनाला प्रतिसाद म्हणून ती मधाळ हसून ‘थँक्यू फॉर युवर सजेशन्स’ म्हणून सगळ्यांची बोळवण करते आणि स्वत:च्या निर्णयावर ठाम राहते, कुठलंही दडपण न घेता! अचानकपणे सिनेमा पाहणाऱ्या तिलाही जाणवतं की, तिला वाटते तितकी व्यावसायिक आयुष्यात ‘तो’ असण्याची गरज नाहीचए! स्वत:शीच अवसानघातकीपणा करण्याची तिला तल्लफ येते आणि ‘जस्ट बी युवरसेल्फ’ असं सांगून मधाळ हसण्याचा प्रयत्न करत तीसुद्धा, स्वत:मधल्या ‘तो’ला प्रथमपुरुषी अवसानातून तृतीयपुरुषी सर्वनामात ढकलून देते!

अनुश्री वर्तक anushreevertak@gmail.com

chaturang@expressindia.com