18 January 2019

News Flash

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेलांकडे पाहून अश्लिल इशारे , तीन तरुणांना अटक

त्यावेळी अनुपमा पटेल यांच्यासोबत पती अपना दल(एस)चे राष्ट्रीय अध्यक्ष आशीष पटेल हे देखील होते

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मिर्झापूर या त्यांच्या लोकसभा मतदार संघातून वाराणसीला परतत असताना रविवारी रात्री ही घटना घडली होती.

मिर्झापूर येथून एक कार्यक्रम संपल्यानंतर पटेल या त्यांच्या ताफ्यासोबत वाराणसीला परतण्याच्या मार्गावर होत्या. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास येथील शास्त्री पुलावरुन जात असताना मागून सुसाट आलेल्या फोर्ड कारने त्यांच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रय़त्न केला. पण ताफ्यातील इतर वाहनांनी त्या गाडीला पुढे जाण्यास अटकाव केला. त्यानंतर फोर्ड गाडीत असलेल्या तीन जणांनी गाडीतूनच अनुपमा यांच्याकडे पाहून अश्लिल इशारे आणि अभद्र टिप्पणी करण्यास सुरूवात केली.

त्यावेळी अनुपमा पटेल यांच्यासोबत त्यांचे पती अपना दल(एस)चे राष्ट्रीय अध्यक्ष आशीष पटेल हे देखील होते. सुरूवातीला पटेल आणि त्यांच्या पतीने याकडे दुर्लक्ष केलं. पण त्या तिघांकडून अश्लिल इशारे सुरूच होते, अखेर चिडलेल्या आशीष पटेल यांनी वाराणसीच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली, आणि त्यानंतर पोलिसांनी वायरलेसद्वारे सूचना देऊन सुसाट जाणाऱ्या फोर्डा गाडीला अडवलं आणि तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

First Published on June 14, 2018 9:13 am

Web Title: 3 arrested for making indecent comments at union minister anupriya patel