07 March 2021

News Flash

टोकियोला ५.७ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

जपानची राजधानी टोकियो शहराला सोमवारी दुपारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.७ इतकी नोंदवली गेली. उत्तर टोकियोतील एका अणुभट्टीजवळ याचा केंद्रबिंदू होता.

| February 26, 2013 01:53 am

जपानची राजधानी टोकियो शहराला सोमवारी दुपारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.७ इतकी नोंदवली गेली. उत्तर टोकियोतील एका अणुभट्टीजवळ याचा केंद्रबिंदू होता. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा मात्र हवामान विभागाने दिलेला नाही. भूकंपानंतर सुमारे ३० सेकंद येथील इमारतींना हादरे बसले होते. या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. स्थानीय वेळेनुसार दुपारी ४.२३ मिनिटांनी हा भूकंप झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 1:53 am

Web Title: 5 7 earthquake shakes buildings in tokyo
टॅग : Earthquake
Next Stories
1 मनोरुग्ण पुत्र ठरला मातेचा काळ..
2 ऑस्कर सोहळा : सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘आर्गो’, ‘लाइफ ऑफ पाय’ला चार पुरस्कार
3 हैदराबादच्या नागरिकांनी शांतता कायम ठेवावी-पंतप्रधान
Just Now!
X