कर्नाटकातील कारवार या ठिकाणी एक बोट बुडाली. ही बोट बुडाल्याने आठजणांचा बुडून मृत्यू झाला. या बोटीमध्ये ३३ लोक बसले बसले होते. या ठिकाणचे कोळी बांधव आणि तटरक्षक दल यांनी मिळून आठ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर इतर सात जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे अशीही माहिती समोर आली आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. जे लोक बुडून मरण पावले त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. बोट बुडाल्यानंतर १८ जणांची लगेच सुटका करण्यात आली.