30 May 2020

News Flash

Delhi Assembly Election 2020: दिल्लीचे तख्त केजरीवालच राखणार, भाजपा आणि काँग्रेसचा होणार सुपडा साफ?

निवडणूक पूर्व सर्वेक्षणाच्या आकडेवारीत भाजपाला धक्का

Delhi Assembly Election 2020

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार सत्तेत येण्याची चिन्ह दिसत आहेत. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणानुसार आपला दिल्ली निवडणुकीमध्ये एकूण ७० जागांपैकी ५४ ते ६० जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी याच सर्वेक्षणामधील विरोधाभासही पहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये आज लोकसभा निवडणुकींच्या सातही जागांवर आज निवडणुका झाल्यास दिल्लीकर भाजपाच्या बाजूने मत देतील असं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्रात भाजपा आणि राज्यात आपच्या दिल्लीकरांचा कौल असल्याचे दिसून येत आहे.

टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या या सर्वेक्षणामध्ये दिल्लीकरांनी आपला पसंती दिल्याचे दिसत आहे. ५२ टक्के दिल्लीकरांनी आपच्या पारड्यात मत दिले आहे तर ३४ टक्के जनतेने भाजपाला मत दिले आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास भाजपाच्या मतांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून दिसत आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आपला कमी मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१५ साली आपला ५५ टक्के मते मिळाली होती. यंदा हा आकडा ५२ टक्के इतका असेल असा अंदाज आहे. २०१५ ला मिळालेल्या मतांपेक्षा आपला अडीच ते तीन टक्के कमी मते मिळतील तर दुसरीकडे भाजपाला २०१५ च्या तुलनेत यंदा १.७ टक्के अधिक मते मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

७० पैकी आपला ५४ ते ६० जागा मिळतील आणि भाजपाला १०-१४ जागांवर समाधान मानावे लागेल असे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. भाजपाला तीन जागांचा फायदा होणार आहे. तर २०१५ साली ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळणाऱ्या आपचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला दिल्लीत केवळ एखाद्या दोन जागांवर विजय मिळू शकतो असंही या सर्वेक्षणाच्या आकडेवारीमधून दिसते. दिल्लीमध्ये प्रामुख्याने आप विरुद्ध भाजपा अशी दुहेरी लढत असेल असंही या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.

फोटो सौजन्य: टाइम्स नाऊ

दिल्लीमध्ये ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 9:43 am

Web Title: aap likely to win 54 60 seats bjp 10 14 cong max 2 says times now ipsos opinion poll scsg 91
Next Stories
1 पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पतीने बॉम्बने उडवलं घर
2 पोलिसांच्या वेशात मुलींच्या हॉस्टेलसमोर केले हस्तमैथुन; व्हिडिओ व्हायरल
3 आंदोलनांमागे कटकारस्थान!
Just Now!
X