अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून होणार आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमवर २४ फेब्रवारी रोजी ट्रम्प यांच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुजरात सरकारडून ट्रम्प यांच्या स्वगताची जोरदार तयारी सुरू आहे. ट्रम्प यांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपड्या दिसू नये म्हणून भिंत बांधली आहे. यामुळे गुजरात आणि केंद्र सरकारवर सोशल मीडियातून टीका केली जात असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. ट्रम्प यांची सभा होणाऱ्या मोटारा स्टेडियमच्या जवळील ४५ कुटुंबाना बेघर व्हावं लागणार आहे.

जगातील सर्वात मोठ्या मोटारा मैदानाचं उद्घाटन ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. लवकरात लवकर घर खाली करा असा दावा मोटारा मैदानाजवळ राहणाऱ्या ४५ कुटुंबांनी केलाय. अहमदाबाद महानगर पालिकानं (एएमसी) नोटीस पाठवून लवकरात लवकर घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

एका रिपोर्ट्सनुसार, ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामुळे आम्हाला घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आल्याचं मोटारा स्टेडियमच्या जवळ राहणाऱ्या २०० कुटुंबाचं म्हणणं आहे. मागील २० वर्षांपासून हे सर्वजण येथे राह आहेत. मात्र, येथील कुटुंबाना पाठवण्यात आलेल्या नोटीस आणि ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्याचा काहीही संबंध नसल्याचे अहमदाबाद महानगर पालिकेच्या आधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

अहमदाबाद महानगर पालिकेनं पाठवलेल्या नाटीसमध्ये म्हटलेय की, अतिक्रमणातील जमीन एएमसीच्या अंतर्गत येते. इथं नगर नियोजन योजनेनुसार अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. झोपड्यांना सात दिवसांत खाली करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जर काही तक्रार असेल तर अहमदाबाद महानगर पालिकेच्या संपर्क कार्यालयात बुधवारपर्यंत भेटावं.

सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. ट्रम्प यांचे भारतात आगमन होण्याअगोदरच अमेरिकेच्या हवाई दलाचे हरक्युलिस विमान व स्नायपर्स अहमदाबाद विमानतळावर सोमवारी दाखल झाले आहे. अमेरिकेच्या हवाई दलाच्या हरक्युलिस विमानात ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा आणली गेली आहे. ज्यामध्ये त्यांच्या ताफ्यातील वाहनांसह विशेष अग्निशमन यंत्रणा व स्पाय कॅमेरे आदींचा समावेश आहे.