News Flash

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम ‘एल अ‍ॅण्ड टी’ला

मिळाली २५ हजार कोटींची वर्क ऑर्डर

(संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या गुजरातमधील कामाचं कंत्राट लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला मिळालं आहे. महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांना हा प्रकल्प जोडणार असून, गुजरातमधील कामाची ऑर्डर एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला मिळाली आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे.

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरातमधील कामाचं कंत्राट मिळवण्यात लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो ही कंपनी यशस्वी ठरली आहे. गेल्या महिन्यात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (एनएचएसआरसीएल) १.०८ लाख कोटी कामाची निविदा खुली केली. ५०८ किमी लांबीच्या या कामासाठी आठ कंपन्या बोली लावण्यासाठी पात्र ठरल्या होत्या.

या आगामी बुलेट ट्रेनमुळे दोन शहरांतील अंतर दोन तासात गाठता येणार आहे. या निविदेमध्ये गुजरातमधील वापी ते वडोदरा या दरम्यानच्या एकूण आखणीच्या ४७ टक्के कामाचा समावेश आहे. यात चार रेल्वे स्थानके असणार आहेत. वापी, सुरत, भरूच आणि बिल्लीमोरा अशी त्यांची नावं आहेत. त्याचबरोबर २४ नद्या, ३० महामार्ग क्रॉसिंग असणार आहे.

कंत्राट मिळल्याची माहिती एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम यांनी पीटीआयशी बोलताना दिली. एल अॅण्ड टीच्या इतिहासाप्रमाणेच कंपनी ही बोली जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. कंपनीनं केंद्राचं मोठं आणि प्रतिष्ठित कंत्राट जिंकलं आहे. चार वर्षात हे काम पूर्ण करण्याचं बंधन असून, दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याबद्दल एल अ‍ॅण्ड टीला विश्वास आहे, असं सुब्रमण्यम म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 4:55 pm

Web Title: ahmedabad mumbai bullet train project l and t wins rs 25000 crore order bmh 90
Next Stories
1 “उठता बसता अदानी, अंबानींवरुन मोदींना बोलणारे टाटांच्या दंड माफीवर काही बोलतील का?”
2 उत्तर प्रदेश : लंडन रिटर्न डॉक्टरला अडीच कोटींना विकला ‘अल्लादिनचा दिवा’
3 फ्रान्समध्ये व्यंगचित्राचा वाद भडकला! अल्ला हू अकबरचे नारे देत चाकू हल्ला; तिघांचा मृत्यू
Just Now!
X