News Flash

‘बेपत्ता’ जॅक मा यांच्यासंदर्भातील मोठी बातमी; चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने पोस्ट केला व्हिडीओ

ऑक्टोबरमध्ये सरकारी धोरणांवर केली होती टीका

काही दिवसांपूर्वी चीनमधील सर्वात नामांकित कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अलीबाबाचे संस्थापक जॅक मा हे बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आलं होतं. अनेक महिन्यांपासून जॅक मा हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये न दिसल्यामुळे वेगवेगळ्या चर्च आणि शक्यतांबद्दल सोशल नेटवर्किंगपासून वृत्तवाहिन्यांपर्यंत सगळीकडेच चर्चा झाली. मात्र आता चीन सरकारच्या मालकीच्या प्रसार माध्यमाने जॅक मा यांचा एका व्हिडीओ जारी केला असून त्यामध्ये चीनमधील ग्रामीण भागातील शिक्षकांशी जॅक मा चर्चा करताना दिसत आहेत. एका व्हर्चूअल मिटिंगमध्ये जॅक मा शिक्षकांशी बोलत होते. नेहमी आपली मत मोकळेपणे मांडणारे जॅक मा हे मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले नव्हते. काही आठवड्यांपूर्वी जॅक मा यांनी टीव्हीवरही येण्यास नकार दिला होता. मागील बऱ्याच काळापासून ते सोशल मीडियावरही सक्रीय नव्हते.

नक्की पाहा >> सरकारी धोरणांवर टीका, ८० हजार कोटींचा तोटा अन् जॅक मा

बुधवारी चीनमधील सरकारी वृत्तवाहिनी असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये जॅक मा दिसून येत आहे. जॅक मा यांनी चीनच्या ग्रामीण भागातील १०० शिक्षकांसोबत ग्रामीण भागात चालवण्यात येणाऱ्या शिक्षण धोरणांसंदर्भात चर्चा केली. करोना महामारीनंतर आपण सारेजण लवकरच भेटूयात असा विश्वास यावेळी जॅक मा यांनी शिक्षकांशी बोलताना व्यक्त केला.

सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार जॅक मा हे सध्या हंग्जाऊ येथील अलीबाबा कंपनीच्या मुख्यालयामध्ये असण्याची शक्यता आहे. सध्या जॅक मा हे अलिबाबा कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य नसल्याने ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार कमी दिसून येत असल्याचं आपण विसरता कामा नये, असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. जॅक मा यांनी चीन सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. मात्र त्यांनी यापूर्वीही अनेकदा अशी टीका केलीय. तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती किंवा त्यांना काही नुकसानही झालं नव्हतं, यासंदर्भातील आठवणही सीएनबीसीच्या या लेखात करुन देण्यात आलीय.

नक्की पाहा >> Photos: ‘ही’ आहे ताशी ६२० किमी वेगाने धावणारी चीनमधील ‘फ्लोटिंग ट्रेन’; फोटो पाहून व्हाल थक्क

नक्की वाचा >> धक्कादायक… करोनाच्या उत्पत्तीची माहिती जगासमोर आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना चीन देतोय त्रास

काय म्हणाले होते जॅक मा?

जॅक मा यांच्या अ‍ॅण्ट समुहासंदर्भात (एएनटी ग्रुप) ऑक्टोबर महिन्यापासून एक नवीन वाद सुरु झाल्याचे वृत्त आहे. जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर २०२० रोजी चीनमधील सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. शांघायमधील आपल्या एका भाषणामध्ये जॅक मा यांनी देशात संशोधनाला वाव मिळत नाही असं मत व्यक्त करण्याबरोबरच जागतिक बँकींगसंदर्भात बोलताना चीन अजूनही जुन्या लोकांचा क्लब असल्यासारखे वाटते असं मत व्यक्त केलं होतं. “आजची आर्थिक व्यवस्था ही औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली आहे. आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण ेकली पाहिजे. आपण आपली सध्याची आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता आहे,” असं परखड मत जॅक मा यांनी व्यक्त केलं होतं. जॅक मा यांनी शेवटचं ट्विटही १० ऑक्टोबर २०१९ रोजी केलं आहे.

नक्की वाचा >> आता धोका Disease X चा; इबोला शोधणाऱ्या डॉक्टरने दिला करोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा इशारा

…अन् आयपीओची परवानगी नाकारली

जॅक मा यांच्या या वक्तव्यानंतर एएनटीच्या आयपीओला चीनमधील सरकारी यंत्रणांनी दिलेली परवानगी नाकारण्यात आली. या आयपीओची किंमत ३७ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. शांघाय स्टॉक एक्सचेंजने एएनटी समुहासंदर्भात काही तक्रारी समोर आल्या असून आर्थिक तंत्रज्ञान नियमकामध्ये बदल करण्यासंदर्भातील तक्रार समोर आल्याचं सांगत कंपनीच्या आयपीओला विरोध केला होता.

नक्की वाचा >> भारतासाठी धोक्याचा इशारा, चीन पोहचला अरुणाचलच्या सीमेजवळ; तिबेटला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण

जगभरात केलीय मदत

चीन सरकारच्या हाती असणाऱ्या यंत्रणांनी अलिबाबा कंपनीविरोधात मत्तेदारी स्थापन करण्यासंदर्भातील चौकशी सुरु केली. डिसेंबर महिन्यामध्ये ही चौकशी सुरु झाली आणि त्यानंतर एएनटी कंपनीला त्यांची रचना बदलण्यासंदर्भातील सूचना सरकारी यंत्रणांनी केल्या. जॅक मा यांनी मध्यंतरी करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोप आणि जागतिक आरोग्य संघटनेला कोट्यावधी फेस मास्क मदत म्हणून पाठवले होते. जॅक मा हे त्यांच्या समाजसेवेसाठीही ओळखले जातात. जॅक मा फाऊण्डेशन हे शिक्षण, व्यवसाय, महिला नेतृत्व आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करतं. फोर्ब्सच्या अहवालानुसार ३०० मिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक मदत करण्याचं उद्देश जॅक मा यांच्या सेवाभावी संस्थेनं समोर ठेवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 12:42 pm

Web Title: alibaba jack ma makes first public appearance since october in online meeting scsg 91
Next Stories
1 IND vs AUS: “टीम इंडियाला जिंकायचं असेल तर…”; सुनील गावसकरांनी दिला कानमंत्र
2 १५७ वेळा नापास झाल्यानंतर अखेर ‘तो’ पास झाला Driving Test ..
3 खरोखरच वानरसेनेने बांधलेला राम सेतू?; सर्व रहस्यांवरुन पडदा उठणार, ASI समुद्राच्या तळाशी करणार संशोधन
Just Now!
X