भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कथित कट आखल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या दहशतवाद्याची दिल्लीच्या एका न्यायालयाने १९ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत रवानगी केली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मध्य प्रदेशातून अटक केलेल्या अझहर इक्बाल याला गुरुवारी जिल्हा न्यायाधीश अमर नाथ यांच्यासमोर हजर करण्यात आले. या आरोपीच्या साथीदारांची ओळख पटवण्यासाठी, तसेच त्यांना निधी कुठून मिळत होता, हे शोधण्यासाठी त्याच्या कोठडीत चौकशीची गरज असल्याचे एनआयएने बंद न्यायालयात झालेल्या सुनावणीत सांगितले. तपासाकरिता या आरोपीला देशात निरनिराळ्या ठिकाणी न्यावे लागेल, असेही एनआयएने न्यायालयाला सांगितले. एनआयएने धडक कारवाईत मध्य प्रदेशातील बारखेडा रायसेन येथील रहिवासी असलेल्या अझहरलाही अटक केली होती.