भारतामध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्याने श्रीलंकेने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर गुरुवारी त्वरेने बंदी घातली. ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, ऑस्टे्रलिया आणि सिंगापूर या देशांनी भारतीय प्रवाशांवर त्याचप्रमाणे अन्य दक्षिण आशियाई देशांमधील प्रवाशांवर अगोदरच बंदी घातली आहे.

भारतातून येणाऱ्या प्रवाशांना श्रीलंकेत प्रवेश दिला जाणार नाही, भारतामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे गुरुवारी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नागरी उड्डाण महासंचालकांनी श्रीलंकन एअरलाइन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, श्रीलंकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार असे आदेश देण्यात येत आहेत की, भारतातून येणाऱ्या प्रवाशांना श्रीलंकेत प्रवेश देण्यात येऊ नये.