News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांचे चोख प्रत्युत्तर

बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले

काश्मीरच्या बांदिपोरा सेक्टरमध्ये रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका पोलीस कॉन्स्टेबलला वीरमरण आले.  झहीर अब्बास असे शहीद झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अजूनही संघर्ष सुरु आहे. अद्यापही भारतीय जवानांकडून या भागात शोध मोहीम सुरुच आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागातील मीर मोहल्या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली. भारतीय जवान, सुरक्षा दलाचे जवान आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत संपूर्ण मीर मोहल्याला घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जवान आणि दहशतवाद्यांच्यातील चकमकीनंतर जवांनाच्या दिशेने दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 12:19 pm

Web Title: bandipora encounter two militants killed and one constable martyr in gun battle
Next Stories
1 … तर राम मंदिराचा तिढा १९९१ मध्येच सुटला असता- शरद पवार
2 जातीव्यवस्था संपवण्यासाठी राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे- रामदास आठवले
3 ‘न्यायालयांचे निकाल पक्षकारांना कळणाऱ्या भाषेत हवेत’
Just Now!
X