21 January 2018

News Flash

परिचारिका जेसिंथाचे पार्थिव मायदेशी

लंडनमधील ‘किंग एडवर्ड सेव्हन हॉस्पीटल’मध्ये कार्यरत असलेल्या व गेल्या आठवडय़ात आत्महत्या केल्याने जगभर हळहळ व्यक्त होत असलेल्या परिचारिका जेसिंथा सालढाणा यांचे पार्थिव भारतात मंगळूर येथे

वृत्तसंस्था , मंगळूर | Updated: December 17, 2012 2:00 AM

लंडनमधील ‘किंग एडवर्ड सेव्हन हॉस्पीटल’मध्ये कार्यरत असलेल्या व गेल्या आठवडय़ात आत्महत्या केल्याने जगभर हळहळ व्यक्त होत असलेल्या परिचारिका जेसिंथा सालढाणा यांचे पार्थिव भारतात मंगळूर येथे रविवारी आणले गेले.
ऑस्ट्रेलियन नभोवाणी वाहिनीच्या जॉकींच्या बोगस दूरध्वनीला भुलून या रुग्णालयात उपचार घेत असलेली युवराज्ञी केट मिडलटन हिच्या प्रकृतीची माहिती जेसिंथा यांनी उघड भाबडेपणाने उघड केली.
ऑस्ट्रेलियाच्या ‘टू डे एफएम’ नभोवाणीवाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे डीजे निवेदक मेल ग्रेग आणि निवेदिका मिशेल ख्रिश्चन या दोघांनी गेल्या आठवडय़ात युवराज चार्ल्स आणि सम्राज्ञी एलिझाबेथ असल्याचे भासवत गर्भवती युवराज्ञी केट हिच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयास पहाटे साडेपाच वाजता दूरध्वनी केला होता. राजघराण्यातून थेट दूरध्वनी आल्याचे समजून परिचारिका जेसिंथा हिने तातडीने हा दूरध्वनी केटवर उपचार सुरू असलेल्या कक्षातील आपल्या सहकाऱ्यांकडे जोडून दिला. तेथून जी माहिती दिली गेली ती या वाहिनीवरून प्रसारित होताच एकच खळबळ उडाली. रुग्णावरील उपचारांची माहिती अत्यंत खाजगी आणि गोपनीय मानली जात असताना कुणीतरी गंमत म्हणून ती इतक्या सवंग पद्धतीने उघड करवली आणि आपणही त्यांच्याकडून फसविले गेलो, या भावनेने जेसिंथा खचून गेली आणि तिने आत्महत्या केली. ती ४६ वर्षांची होती आणि तिच्यामागे पती बेनेडिक्ट, एक मुलगा आणि मुलगी आहे.

First Published on December 17, 2012 2:00 am

Web Title: body of jacinta saldanha arrives in mangalore
टॅग Jacinta Saldanha
  1. No Comments.