08 March 2021

News Flash

विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक

लंडन पोलिसांनी ही कारवाई केली आहे

विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली आहे. इक्वेडोरच्या दुतावासातून त्याला अटक करण्यात आली आहे. आपली अटक टळावी या उद्देशाने असांज याच दुतावासात वास्तव्य करत होता. इक्वेडोरने त्याला देण्यास नकार दिला. त्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली. विविध देशांची, राजकारण्याची माहिती, कागदपत्रे, संभाषण असांजने जाहीर केले होते. त्यामुळे त्याला अटक व्हावी यासाठी अनेक मंडळी प्रयत्नात होती. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

असांजला अटक करण्यात आली असून त्याला वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. असांजने २०१० मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली होती. आपली अटक टळावी म्हणून तो २०१२ पासून इक्वाडोर येथील दुतावासात वास्तव्य करत होता. १२ डिसेंबर २०१८ ला त्याला इक्वाडोरचे नागरिकत्व मिळाले होते.

इक्वाडोर सरकारने असांजला दिलेला आश्रय काढून घेतल्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुप्त कागदपत्रे आणि गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 3:36 pm

Web Title: british police arrest wikileaks founder julian assange
Next Stories
1 FAKE NEWS – पाकिस्तानी वैमानिकांना राफेल चालवण्याचे प्रशिक्षण
2 राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; चेहऱ्यावर लेझर लाईटच्या माऱ्याने खळबळ
3 मोदींना वाटत असेल की ते अजिंक्य आहेत तर तो त्यांचा गैरसमज-सोनिया गांधी
Just Now!
X