12 July 2020

News Flash

मोदींनी त्यांच्या मातोश्रींची काळजी मला घेऊ द्यावी- काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र!

भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रिक्षातून प्रवास करतात आणि एका छोट्या घरात राहतात हे पाहून व्यथित झालो असल्याचे म्हणत काँग्रेसच्या एका

| May 7, 2014 08:05 am

भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रिक्षातून प्रवास करतात आणि एका छोट्या घरात राहतात हे पाहून व्यथित झालो असल्याचे म्हणत काँग्रेसच्या एका नेत्याने थेट मोदींना पत्र लिहून मातोश्रींची काळजी घेण्यास सांगितले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी मोदींना लिहीलेल्या पत्रात म्हणतात की,”मोदी आपल्या वैयक्तीक जिवनात यशस्वी असूनसुद्धा त्यांनी आपल्या मातोश्रींना आरामदायी आयुष्य दिलेले नाही. ज्या मातेने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्चीले त्या मातोश्रींचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी आपण काहीही करत नाही, ही गोष्ट समजण्यात मी अपयशी ठरलो आहे. आपल्या मातोश्री या मलाही मातोश्रीसारख्याच आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यामनात आदर आहे. आपल्याइतके विविध मोठ-मोठाले स्त्रोत माझ्याकडे नाहीत, तरीही त्या मातोश्रींना आवश्यक सुविधा पुरविण्याची परवानगी आपण मला द्यावी.” असेही अल्वी यांनी पत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2014 8:05 am

Web Title: congress leader writes to narendra modi offering to take care of his mother
टॅग Narendra Modi
Next Stories
1 भाजप नेत्याची प्रियांका गांधींविरोधात न्यायालयात तक्रार
2 पंतप्रधानांना निवृत्तीचे ‘गिफ्ट’: नवीन घरात विनामूल्य पाणी आणि वीज!
3 इशरत चकमकप्रकरणी अमित शहा निर्दोष
Just Now!
X