क्युरिऑसिटी रोव्हरच्या मास्टकॅमची कामगिरी
नासाच्या मंगळावर पाठवण्यात आलेल्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हर या गाडीने तेथील जुन्या भूगर्भशास्त्रीय स्तरांची रंगीत छायाचित्रे पाठवली आहेत. सध्या रोव्हर गाडी मरे ब्युटीस भागात असून तो माउंट शार्प पर्वताचा खालचा भाग आहे.
मास्टकॅमने ८ सप्टेंबरला ही छायाचित्रे घेतली असून रोव्हर चमूने सर्व छायाचित्रांची एकत्रित जुळणी केली आहे. क्युरिऑसिटीच्या चमूने मंगळाच्या नैऋत्येला अमेरिकी वाळवंटासारखा भाग असल्याचे म्हटले आहे, क्युरिऑसिटी प्रकल्पातील वैज्ञानिक अश्विन वासवदा यांनी सांगितले की, मंगळावर ब्युटीस व मेसाज नावाचे भाग वर आलेले दिसतात ते पूर्वीच्या वालुकाश्मांचे अवशेष आहेत. माउंट शार्पचा खालचा भाग तयार होत असताना त्यांची निर्मिती झाली.
ब्युटेस नावाच्या भागाचा अभ्यास केल्याने मंगळावरील वालुकाश्मांची माहिती मिळू शकते. भूजलामुळे त्यांची रासायनिक रचना बदलली होती व त्यामुळे क्षरण झालेला भूभाग तयार झाला. क्युरिऑसिटी गाडीने मरे ब्युटीस भागाची जी छायाचित्रे पाठवली आहेत ती अलीकडची असली तरी महिनाभरापूर्वीही अशी छायाचित्रे पाठवण्यात आली होती.
क्युरिऑसिटी गाडीने दक्षिणेकडील ब्युटीस भागाची सफर करताना छायाचित्रे काढली होती. रोव्हर गाडीने तेथे उत्खनन सुरू केले असून ते पूर्ण झाल्यावर ती माउंट शार्पच्या दक्षिणेला दूरवर जाईल. क्युरिऑसिटी गाडी माउंट शार्प येथे २०१२ मध्ये उतरली होती व २०१४ मध्ये तेथील काही भागांचे पुरावे पाठवले होते या भागात सरोवरांना अनुकूल स्थिती होती व मंगळ एकेकाळी जीवसृष्टीस योग्य असेल तर तिथे २ अशी सरोवर होती असे मानले जाते.
माउंट शार्पच्या पायथ्याशी काही खडकांचे खर असून ते काही अब्ज वर्षांपूर्वी तळ्यांमध्ये तयार झाले असावेत. तेथे एकेकाळी वस्तीयोग्य स्थिती होती तर ती नाहीशी कधी व केव्हा तसेच कशी झाली यावर संशोधन सुरू आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 1:28 am