08 December 2019

News Flash

काश्मीर प्रश्नी मोदींनी मदत मागितल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अशी कोणतीही मदत मागितली नसल्याचं परराष्ट्र खात्याने म्हटलं आहे

अमेरिकेतील व्हाईट हाऊस या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान आपण काश्मीर प्रश्नात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात मदत मागितली होती असा दावा केला. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. काश्मीर प्रश्नी भारताने ट्रम्प यांची मदत मागितली नसल्याचे MEA ने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे अशाप्रकारे कोणतीही विनंती केली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मोदींनी आपली मदत मागितली होती, मध्यस्थी करण्याची विनंती केली होती त्यात काही तथ्य नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे कोणतीही मदत मागितली नसल्याचा दावा भारतीय परराष्ट्र खात्याने केला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले आहेत हीच बाब स्पष्ट होते आहे.

पाकिस्तानसोबत काश्मीर प्रश्नी द्विपक्षीय चर्चा हेच भारताचे धोरण आहे. मात्र ही चर्चा सुरु करायची असेल तर सीमेवरचा दहशतवाद पाकिस्तानला थांबवावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांची भेट जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली तेव्हा त्यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची आपली तयारी आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्याकडे मदत मागितली होती असा दावा केला. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाप्रकारे कोतणीही मदत मागितली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

 

First Published on July 23, 2019 7:13 am

Web Title: donald trump says pm narendra modi sought mediation kashmir issue mea denies scj 81
Just Now!
X