राजकारणातील प्रवेशाबद्दलची भूमिका आपण यापूर्वीच स्पष्ट केली आहे त्यामुळे त्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित करून आपल्याला आणखी क्लेश देऊ नयेत, असे आवाहन दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी सोमवारी आपल्या चाहत्यांना केले.

रजनीकांत यांनी निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी त्यांच्या चाहत्यांनी रविवारी येथे आंदोलन केले, मात्र राजकारणात प्रवेश न करण्याची कारणे आपण स्पष्ट केली आहेत, असे ते म्हणाले. आपण राजकारणात प्रवेश करावा यासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित करून आपल्याला आणखी क्लेश देऊ नयेत, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

रजनी मक्कल मंदरममधून (आरएमएम) हकालपट्टी करण्यात आलेले पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासह काही जणांनी रविवारी आंदोलन केले, असे आपल्या निदर्शनास आले आहे.