News Flash

जाक शिराक यांचे निधन

फ्रान्सचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले जाक शिराक यांचे गुरुवारी वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले.

जाक शिराक

पॅरिस : फ्रान्सचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले जाक शिराक यांचे गुरुवारी वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. ज्यूंच्या नरसंहारात फ्रान्सच्या भूमिकेची कबुली देणारे पहिले नेते असलेल्या चिराक यांनी २००३ साली अमेरिकेने इराणवर केलेल्या आक्रमणाचा उद्दामपणे विरोध केला होता.

शिराक यांनी त्यांच्या प्रियजनांच्या सहवासात शांततेने चिरनिद्रा घेतली, असे त्यांचे जावई फ्रेडरिक सालत- बरॉ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण नमूद केले नाही. २००७ साली अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर शिराक यांना आरोग्यविषयक अनेक त्रास होते.

फ्रान्सच्या पुराणमतवादी उजव्या पक्षाचे नेते असलेले शिराक हे सुमारे दोन दशके पॅरिसचे महापौर होते. त्यांचा करारीपणा व महत्त्वाकांक्षा यामुळे त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांना ‘ला बुलडोझर’ असे नाव मिळाले होते. १९९५ ते २००७ या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ते परिपूर्ण असे जागतिक राजनीतिज्ञ होते, मात्र अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात किंवा २००५ साली पोलीस व अल्पसंख्याक युवक यांच्यातील चकमकींचे देशभरात दंगलीत रूपांतर झाल्यानंतर तणाव निवळण्यात ते अपयशी ठरले होते.

असे असले तरी शिराक यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात धाडस आणि मुत्सद्देगिरी यांचे दर्शन घडवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 2:17 am

Web Title: ex french president jacques chirac dies at aged 86 zws 70
Next Stories
1 ब्रिटनच्या पंतप्रधानांचा संसदेत पुन्हा पराभव
2 ट्रम्प यांच्यावरील आरोपांत तथ्य नाही – व्हाइट हाऊस
3 भाजप- १४४, शिवसेना -१२६, मित्रपक्ष-१८ महायुतीचा नवा फॉर्म्युला ?
Just Now!
X