दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी राजकारणाच्या क्षेत्रातील आहे. मित्रपक्ष शिवसेनेचा राग शांत करण्यासाठी भाजपने एक खास ऑफर सेनेला देऊ केली आहे. तर दुसरी महत्वाची बातमीही राजकारणातीलच असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्यांच्या फटकऱ्यांनी पुन्हा एकदा मोदी शहा जोडीवर टिका केली आहे. या शिवाय क्रिडा क्षेत्रातील महत्वाची बातमी म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने बॉल टॅम्परिंग प्रकरणी महत्वाचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देश-विदेश, राज्य, क्रिडा आणि मनोरंजन श्रेत्रातील महत्वाच्या बातम्या जाणून घ्या ‘लोकसत्ता’च्या ऑनलाइन बुलेटीनमध्ये…