19 March 2019

News Flash

कोलकाताला जाणाऱ्या जहाजाला भीषण आग, २२ पैकी ११ क्रू मेम्बर्सना वाचवण्यात यश

जहाजावर एकूण २२ क्रू मेम्बर होते. यापैकी ११ जणांना वाचवण्यात यश आलं असून इतरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत

कोलकाताला जाणाऱ्या MVSSL या मालवाहू जहाजाला भीषण आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. हे जहाज कृष्णपटनम येथून कोलकाताला जात असताना ही आग लागली. कंटेनरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागली आहे. जहाजावर एकूण २२ क्रू मेम्बर होते. यापैकी ११ जणांना वाचवण्यात यश आलं असून इतरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ही आग लागली आहे. जहाजावर आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाटी हलदिया येथून मदत पाठवण्यात आली आहे. हवामान खराब असल्या कारणाने आणि वेगाने वारे वाहत असल्या कारणाने आग वेगाने वाढत आहे. २२ पैकी ११ क्रू मेम्बर्सना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही बचावकार्य अद्यापही सुरु आहे.

First Published on June 14, 2018 1:18 pm

Web Title: fire in ship mv ssl after container blast