गुजरात निवडणुकांचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. त्यानुसार भाजप काँग्रेसपेक्षा सरस ठरत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत अनेक फॅक्टर्स निर्णायक ठरले. जाणून घेऊयात असेच काही मुद्दे….

> गुजरातमधील ५० टक्क्यांहून अधिक मतदार ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत

> यंदाच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रितरित्या ६४ सार्वजनिक सभा घेतल्या

> भाजपने ३४ तर काँग्रेसने ३० सार्वजनिक सभा घेतल्या

> एकूण महिला मतदारांची संख्या ४८ टक्के तरी आत्तापर्यंत गुजरातमध्ये केवळ एकदाच महिलेने मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

> १८२ पैकी केवळ ११ जागी भाजपने तर १० जागी काँग्रेसने महिलांना उमेदवारी दिली होती.

> पहिल्यांदाच पूर्णपणे महिलांनी एखाद्या मतदार केंद्रावर सर्व जबाबदारी पार पाडली

> यंदा ६८.७० टक्के मतदान झाले. २०१२ साली हाच आकडा ७१.३२ इतका होता. म्हणजे यंदा मतदानाची टक्केवारी २.९१ टक्क्यांनी घसरली

> मोदींचा सी प्लेन दौरा आणि राहुल गांधींनी १२ हिंदू मंदिरांना दिलेली भेट यंदाच्या निवडणुकींच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरले.

> पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडीट ट्रायल (व्हीव्हीपीएटी) मशिन्सचा वापर करण्यात आला. यामुळे मतदारांना आपले मत पडले की नाही हे तपासून पाहता येते.

> भाजपने पट्टीदार समाजातील ५० ओबीसी समजातील ५८ तर १३ दलित समाजातील उमेदवारांना यंदा तिकीट दिले होते

> काँग्रेसने पाटीदार समाजातील ४१, ओबीसी समजातील ६२ आणि दलित समजातील १४ उमेदवारांना तिकीट दिले होते

> १९८५ साली काँग्रेसला एकूण मतदानापैकी सर्वाधिक मते मिळाली होती. १९८५ साली एकूण ५५.५५ टक्के मते काँग्रेसच्या पारड्यात पडली होती