हाँगकाँगच्या टायफून बंदरात उभ्या असलेल्या १६ जहाजांना रविवारी सकाळी एका पाठोपाठ एक आग लागली. या दुर्घटनेत १० जहाजं पाण्यात बुडाली. तसेच एक व्यक्ती दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयाच उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हाँगकाँगच्या टायफून बंदरात रात्री २.३० च्या सुमारास आग लागली. या आगीनं बघता बघता रोद्र रुप धारण करत १६ जहाजांना आपल्या कवेत घेतलं. जवळपास साडेसहा तास ही आग धुमसत राहिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत तिथपर्यंत १६ जहाजांचं नुकसान झालं होतं.

आग आटोक्यात आली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवांनी जहाजांवरील ३५ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक जण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Video: अमेरिकेतील न्यू मॅक्सिकोत हॉट एअर बलून हवेतच फुटल्याने ५ जणांचा मृत्यू

आग लागल्याची माहिती स्थानिक अग्निशमन दलाच्या कार्यालयाला दिली. त्यानंतर आगीची व्यापकता पाहता ११ फायर बोट मॉनिटर, ८ जेट घटनास्थळी पोहोचले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ४ टीम घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत होत्या. अखेर साडेसहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.