अमेरिकेतल्या न्यू मॅक्सिकोतील अल्बुकर्के शहरात हॉट एअर बलून कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने फुगा हवेतच फुटला आणि वेगाने खाली पडला. त्यामुळे हॉट एअर बलूनमधून आनंद लुटणाऱ्या पाच जणांचा मत्यू झाला. यात पायलट सहित तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यापैकी चार जणांचा मृत्यू जागीच झाला. तर एकाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हॉट एअर बलूनमध्ये बसलेल्या व्यक्तींचं वय हे ४० ते ६० आसपास होतं.

ही दुर्घटना शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. फुगा वर गेल्यानंतर त्याला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे फुग्याला आग लागली आणि फुटला. त्यानंतर ३० मीटर उंचीवरून थेट खाली पडला. फुगा हवेतच फुटल्याने वेगाने वरून खाली पडला. सोशल मीडियावर या दुर्घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

या दुर्घटनेनंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघातानंतर अल्बुकर्के शहरातील १३,७७७ ग्राहकांची वीज खंडीत झाली होती. जवळपास ४ तासांच्या अथक परिश्रमानंतर वीज पुन्हा सुरु करण्यात यश आलं आहे. हॉट एअर बलूनला पुन्हा एकदा परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुर्घटना झालेल्या भागात न जाण्याची ताकीद देण्यात आली आहे. अल्बुकर्के शहरात दरवर्षी हॉट एअर बलून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ९ दिवस हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थिती लावतात.