कांथी दक्षिण : पूर्व मेदिनीपूर जिल्ह्य़ातील प्रभावशाली अशा अधिकारी कुटुंबाचा ‘खरा चेहरा’ ओळखू न शकल्याचा दोष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी रविवारी आपल्याकडे घेतला आणि यासाठी स्वत:चे वर्णन ‘मोठे गाढव’ असे केले.

पूर्वी जवळचे सहकारी असलेल्या आणि आता प्रतिस्पर्धी म्हणून नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध ममता यांनी येथील प्रचारसभेत संताप व्यक्त केला. उभारले असल्याच्या अफवा आपण ऐकल्या असल्याचे त्या म्हणाल्या.

अधिकारी कुटुंबाची तुलना ममतांनी मीर जाफर याच्याशी (देशद्रोही) केली. या भागातील लोक हे चालवून घेणार नाहीत आणि त्यांना मतपेटीतून उत्तर देतील, असे त्या म्हणाल्या. भाजपचे वर्णन त्यांनी ‘बदमाश आणि गुंडांचा पक्ष’ असे केले. जमीनदार म्हणून पूर्व मेदिनीपूर जिल्ह्य़ाचे संपूर्ण नियंत्रण मिळवून येथे सत्ता गाजवल्याचा ठपका ममतांनी अधिकारी कुटुंबावर ठेवला.

शिशिर अधिकारी भाजपमध्ये

एगरा : तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील अनुभवी खासदार आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत येथे भाजपमध्ये प्रवेश केला.तृणमूलने  ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली, त्यामुळे मला पक्ष बदलणे भाग पडले, असे  अधिकारी कुटुंबाचे प्रमुख शिशिर अधिकारी म्हणाले.