News Flash

शुन्य डिग्री तापमानात, १८ हजार फुट उंचीवर जवानांची योग प्रात्याक्षिकं

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांकडून जागतिक योग दिन साजरा

शुन्य डिग्री तापमानात, १८ हजार फुट उंचीवर जवानांची योग प्रात्याक्षिकं

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जगभरातील नागरीक योगासनं करून हा दिवस साजरा करत आहेत. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांनी देखील तब्बल १८ हजार फुट उंचीवर लडाख मधील शुन्य डिग्री तापमानात योग प्रात्याक्षिकं करून योग दिवस साजरा केला.

अत्यंत खडतर अशा ठिकाणी जवानांनी अगदी शिस्तबद्धरित्या केलेल्या योगासनांसह सुर्यनमस्कार, प्राणायाम आदींचा व्हिडिओ व फोटो आयटीबीपीकडून शेअर करण्यात आले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने ते शेअऱ केले आहेत.सध्या भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाही या ठिकाणी देखील १४ हजार फुट उंचीवरील बद्रीनाथ जवळील वसुधर ग्लॅशियर येथे जवानांनी योगासनं केली.

या शिवाय अरुणाचल प्रदेश येथे देखील जवानांनी योग प्रात्याक्षिकं व प्राणायम केले. येथील लोहितपूरमधील अॅनिमल ट्रेनिंग स्कुल येथे घोड्यांवर चढून जवानांनी योगा केल्याचे दिसून आले.

जगावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. मोदी म्हणाले,”करोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्यानं घेत आहे. योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचं भाग बनवावं,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

“योग दिन हा एकात्मतेचा दिवस आहे. जो आपाल्याला जोडतो. सोबत आणतो तोच तर योग आहे. करोनाच्या या संकटाच्या काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग हे दाखवून देतो की, लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचं ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. करोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसनं आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात,” असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 11:43 am

Web Title: itbp personnel perform yoga at an altitude of 18000 feet msr 87
Next Stories
1 अजब शिक्षा : आठवडाभर बेपत्ता असलेल्या महिलेची परतल्यावर पतीला खांद्यावर बसवून धिंड
2 करोनाच्या संकटात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम फायदेशीर -पंतप्रधान मोदी
3 देशात करोनाबाधितांचा आकडा ४ लाखांच्या पुढे; २४ तासांत आढळले आतापर्यंचे सर्वाधिक रुग्ण
Just Now!
X