News Flash

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात चार जवान जखमी

जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील बिजभेरा गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान सोमवारी सकाळी जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या जवानांकडून लगेचच दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यात आले.
बीजभेरा गावातून निघालेल्या सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये चार जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर लगेचच इतर जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. गोळीबारानंतर लगेचच दहशतवादी आजूबाजूच्या परिसरात पळून गेले. या घटनेनंतर पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून परिसरात हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 11:26 am

Web Title: jk unidentified gunmen injure four crpf personnel
टॅग : Terrorist Attack
Next Stories
1 भारत-पाक चर्चेनंतर सुषमा स्वराज मंगळवारी पाकिस्तानला जाणार
2 … आणि सचिनने राज्यसभेत विचारला प्रश्न
3 हेरगिरी प्रकरणी लष्करातील हवालदाराला अटक
Just Now!
X