कर्नाटकातील एक आगळीवेगळी चोरीची घटना समोर आली आहे. तब्बल सव्वा लाख रूपये किंमतीचे शेण चोरी झाल्याचे समोर आले आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. पोलीसांनी संबधीत सरकारी आधिकाऱ्याला अटक केली आहे. कर्नाटकातील बिरुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पशुपालन विभागातून एका व्यक्ती गायचे शेण चोरी झाल्याची तक्रार दिली होती. सीपीआय सत्यनारायण स्वामी यांनी शेण चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. गायीच्या शेणाचा वापर शेताममध्ये सेंद्रीय खत निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून शेणाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते.

पोलिसांच्या माहितीप्रमाणे, ३५ ते ४० ट्रक शेण चोरीला गेले आहे. या शेणाची किंमत जवळजवळ एक लाख २५ हजार होते. सहाय्यक संचालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास केला असता हे शेण अमृतमहलच्याच एका निरीक्षकानेच चोरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या निरीक्षकाने एका मित्राच्या शेतावर सारे शेण लपवून ठेवले होते. या शेणाचा वापर प्रामुख्याने शेतातील खतासाठी होतो. तेव्हा हे शेण विकून रग्गड पैसे कमवण्याचा यांचा विचार होता.  या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पशुपालन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला आणि अन्य एकाला अटक केली आहे.