टॅबलेटच्या वाढत्या मागणीला अनुसरून सोनी आणि सॅमसंग कंपनीने नवे टॅबलेट्स बाजारात आणले आहेत. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या आधीच्या टॅबलेट्स मॉडेल्समधील वैशिट्यांमध्ये वाढ करत सोनीने एक्स्पिरिया झेड आणि सॅमसंगने गॅलेक्सी मेगा हे टॅबलेट्स बाजारपेठेत दाखल केले आहेत. या टॅबेलेट्सची वैशिट्ये पुढील प्रमाणे-

सोनी एक्स्पिरिया टॅबलेट झेड
* टचस्क्रीन- १०.१ इंच (१९२०x १२०० पिक्सेल)
* प्रोसेसर- क्योड-कोअर क्योलकोम प्रोसेसर
* ऑपरेटिंग सिस्टीम- अँड्रॉइड जेलीबीन (४.१.२)
* अंतर्गत मेमरी- १६ जीबी (क्षमता ६४ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते)
* वजन तुलनेने ४९५ ग्रॅम
* ध्वनी- अंतर्गत दोन स्पीकर
* कंपनीच्या मते हा टॅबलेट ३० मिनिटे पाण्यात राहीला, तरी कोणताही परिणाम यावर होणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी मेगा ६.३
सॅमसंगने फॅबलेट क्षेत्रात गॅलेक्सी मेगा नावाचा फॅबलेट बाजारात आणलाय, गॅलेक्सी मेगाचे ५.८ इंच आणि ६.३ इंच असे दोन प्रकार बाजारात दाखल केले आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे २५,१०० रु. आणि ३१,४९० रु. इतकी आहे. गॅलेक्सी मेगा फॅबलेटमध्ये ८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि १.९ मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे.
* ऑपरेटिंग सिस्टीम- अँड्रॉइड जेलीबीन (४.२)
* अंतर्गत मेमरी- १६ जीबी (क्षमता ६४ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते)
* बॅटरी क्षमता- १२ तास