मदर डेअरी या दूध कंपनीनेही दुधाचे दर प्रती लीटर २ रूपयांनी वाढवले आहेत. २१ मे पासून अमूल या भारतातील प्रसिद्ध ब्रांडनेही दुधाच्या दरात प्रती लीटर दोन रूपयांची वाढ केली होती. त्यापाठोपाठ आता मदर डेअरीनेही दुधाचे दर प्रति लीटर २ रूपयांनी वाढवले आहेत. २५ मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत. पॉलि पॅकमध्ये मिळणाऱ्या दुधाचे दर वाढवण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

अमूल या हा गुजरात को ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड ब्रांड आहे. या कंपनीचे संचालक आर एस सोधी यांनी सोमवारी दरवाढीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले आहेत. ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.