01 March 2021

News Flash

नितीन गडकरी म्हणतात, देशात रामभक्तांचे सरकार

हिंदूंना चार मुले असावीत वगैरे मुक्ताफळे उधळून भाजप खासदारांनी पंतप्रधान मोदी यांना जेरीस आणले असतानाच आता त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली आहे.

| January 22, 2015 11:38 am

हिंदूंना चार मुले असावीत वगैरे मुक्ताफळे उधळून भाजप खासदारांनी पंतप्रधान मोदी यांना जेरीस आणले असतानाच आता त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या रामभक्तांचे आता देशात सरकार असून लवकरच राम वनगमन मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जाईल, असे गडकरी यांनी जाहीर केले आहे. ‘रामभक्तांचे सरकार’ या त्यांच्या वक्तव्यामुळे गडकरी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर यांना जोडणारा राम-जानकी मार्ग तयार करण्याची घोषणा केली होती. फैजाबादचे खासदार लल्लूसिंह यांनी अयोध्या ते मध्य प्रदेशातील चित्रकूट असा राम वनगमन मार्ग कधी होईल याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावर गडकरी यांनी वरील वक्तव्य केले. गडकरी यांच्या या वक्तव्यावर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 11:38 am

Web Title: nitin gadkari kicks up row says we are a government of ram bhakts
टॅग : Bjp,Nitin Gadkari
Next Stories
1 काँग्रेस नेत्याकडून मोदीस्तुती
2 आयपीएल सट्टेबाजी : मयप्पन, कुंद्रा दोषी, श्रीनिवासन यांनाही दणका
3 ‘आप’मध्ये सगळं आलबेल नाही – शांतीभूषण यांचा घरचा आहेर
Just Now!
X