24 October 2020

News Flash

छे ! ‘ती’ला ओळखतही नव्हतो!

दिल्ली बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने आपण पीडित मुलीला ओळखतही नव्हतो, शिवाय बलात्काराची घटना घडली त्या दिवशी आपण दिल्लीतही नव्हतो, असा अजब युक्तिवाद शुक्रवारी विशेष न्यायालयात

| July 13, 2013 06:40 am

दिल्ली बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने आपण पीडित मुलीला ओळखतही नव्हतो, शिवाय बलात्काराची घटना घडली त्या दिवशी आपण दिल्लीतही नव्हतो, असा अजब युक्तिवाद शुक्रवारी विशेष न्यायालयात केला.
गेल्या वर्षी १६ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या पीडित मुलीचा २९ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर खटला दाखल केला आहे. या सर्व आरोपींची साक्ष सध्या नोंदवली जात आहे. या आरोपींपैकी एक असलेल्या अक्षय ठाकूरची शुक्रवारी न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी त्याने या प्रकाराबद्दल कानावर हात ठेवले. मुळात पीडित मुलीला आपण ओळखतही नव्हतो. शिवाय १५ डिसेंबरलाच आपण दिल्ली सोडून मूळ गावी कामानिमित्त परतलो होतो त्यामुळे या प्रकरणात आपला हात असणे शक्यच नसल्याचे न्यायालयात सांगितले. दिल्ली पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात गोवले असल्याचा आरोपही अक्षयने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 6:40 am

Web Title: no i didnt know her delhi rape case accused turn back
Next Stories
1 प्लुटोच्या चंद्राची छबी छायाचित्रात बद्ध
2 राजीव गांधींच्या जयंती दिवशी अन्नसुरक्षा योजना होणार लागू
3 अश्लील संकेतस्थळांवर प्रतिबंध घालणे कठीण!
Just Now!
X