सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार केलेला वेगवान महासंगणक सिक्कीमला देण्यात आला आहे. या महासंगणकाची गणनक्षमता १५ टेराफ्लॉप आहे. सिक्कीमच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेत गंगटोक येथे परम कांचनजुंगा हा महासंगणक ठेवण्यात आला असून सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्सड कॉम्प्युटिंग व दूरसंचार-माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे तो तयार केला आहे. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या महासंगणकाचे अनावरण झाले.

परम कांचनगंगा हा ईशान्येकडील राज्यातील सर्वात वेगवान महासंगणक आहे शिवाय तो सर्व एनआयटीमधीलही वेगवान महासंगणक आहे, असे सिक्कीम एनआयटीचचे संचालक प्रा. अरुण समादार यांनी सांगितले. या महासंगणकात इंटेल आधारित संस्कारक (प्रोसेसर) असून गणनक्षमता १५ टेराफ्लॉप आहे त्यामुळे सर्व पातळ्यांवरील संशोधनास चालना मिळणार आहे. या महासंगणकाची किंमत दोन कोटी रुपये आहे. महासंगणकासाठी लागणाऱ्या विद्युत व वातानुकूलन सुविधांसाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. पुण्याच्या सीडॅकचे कार्यकारी संचालक हेमंत दरबारी यांनी सांगितले, की महासंगणन ही आता उद्योगांसाठी आवश्यक सुविधा आहे व त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल. भारतासह फार थोडय़ा देशांकडे महासंगणक तयार करण्याची क्षमता आहे, त्याच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान व उद्योगातील अनेक आव्हानांना तोंड देता येईल. नव्या महासंगणकाच्या मदतीने एनआयटीच्या दोन वैज्ञानिकांनी मध्यपूर्व ते भारत यांच्यातील पाइपलाइनच्या माध्यमातून इंधन वहन कार्यक्षमता कशी वाढवता येईल यावर संशोधन सुरू केले आहे. हवामान अंदाजासाठी सागरी जलाचे पृष्ठीय तपमान मोडण्याच्या सादृश्यीकरण प्रकल्पातही त्याचा वापर केला जात आहे.

cancer, Nagpur, cobalt devices,
नागपुरात कर्करुग्णांचे हाल थांबणार कधी? कालबाह्य कोबाल्ट यंत्रावरच…
Sensex, Nifty, Nifty pulls back,
‘सेन्सेक्स’ला ७०० अंशांची झळ; ‘निफ्टी’ विक्रमी पातळीपासून माघारी
Where is the highest temperature in the Maharashtra state Pune print news
उष्म्याने केला कहर… राज्यात सर्वाधिक तापमान कुठे ?
loksabha poll 2024
Loksabha Poll 2024 : देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार, कोणत्या राज्यात किती मतदान? जाणून घ्या…

पर्यटकांना रस्त्यांची स्थिती समजावी यासाठी नवीन महासंगणकाच्या माध्यमातून एका अ‍ॅपच्या मदतीने तत्काळ माहितीची सुविधा विद्यार्थी प्रकल्पांच्या माध्यमातून मिळाली आहे.