News Flash

रुग्ण बनला प्रियकर, आता नर्सने केला बलात्काराचा आरोप

लग्नाचे आश्वासन मोडल्यानंतर एका नर्सने प्रियकरावर बलात्काराचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महादेवा प्रसाद (२५) असे आरोपीचे नाव आहे.

लग्नाचे आश्वासन मोडल्यानंतर एका नर्सने प्रियकरावर बलात्काराचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महादेवा प्रसाद (२५) असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार आहे. तीन वर्षांपूर्वी महादेवा प्रसाद म्हैसूर येथील एका रुग्णालयात दाखल होता. त्यावेळी त्याचे नर्सबरोबर प्रेमसंबंध जुळले. पीडित तरुणी त्या रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. दोघेही कर्नाटकातील गुंडलूपेठ येथे रहायला असून दोघांची जातही समान आहे.

महादेवा प्रसादला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तो नर्सच्या संपर्कात होता. वर्षभरानंतर त्याने तिला बंगळुरुतील एका मोठया हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी मदतही केली. आरोपी बंगळुरुत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवले. काही महिन्यांपूर्वी या नर्सने लग्नाचा विषय काढला तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

दोघेही एकाच जिल्ह्यातले, एकाच जातीचे असल्याने लग्नात फारशा अडथळयाची शक्यता नव्हती. तरीही त्याने टाळाटाळ सुरु केली. जेव्हा महादेवा प्रसादने लग्नाची तिची मागणी पूर्णपणे फेटाळून लावली तेव्हा संबंधित नर्सने त्याच्याविरोधात कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत तक्रार दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 4:53 pm

Web Title: nurse slaps rape case against boyfriend
Next Stories
1 भाजपा मला गाय दान करेल का?-ओवेसी
2 “सोनिया गांधींनी छट पूजा केली असती तर त्यांच्या पोटी हुशार मूल जन्माला आले असते”
3 Fantastic; मंत्रीच फरार असल्याचे समजल्यावर सुप्रीम कोर्टाची प्रतिक्रिया
Just Now!
X