03 June 2020

News Flash

Coronavirus : घर रिकामं करा, नाहीतर बलात्कार करू; सोसायटीच्या पदाधिकाऱ्याची डॉक्टरला धमकी

याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर रूग्णांची सेवा करत आहे. यातच ओडिशातील भुवनेश्वरमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. या ठिकाणी एका डॉक्टरवर आपलं घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. जर त्यांनी आपलं घर रिकामं केलं नाही तर बलात्कार करू अशी कथितरित्या धमकी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानं दिली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संबंधित महिला डॉक्टरनं याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, सोसाटीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनुप कुमार साहो यांनी दिली आहे. ‘टाईम्स नाव्ह’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, सोसायटीकडूनही महिला डॉक्टरविरोधात काऊंटक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

बलात्काराच्या धमकीनं भीती
आपण एक डॉक्टर आहोत आणि आपल्यामुळे सोसायटीत करोना पसरेल अशी भीती रहिवाशांना वाटत आहे. त्यामुळे आपल्याला घर रिकामं करायला सांगितलं जात आहे, असं महिला डॉक्टरनं एफआयआरमध्ये म्हटलं आहे, तर आपण घर रिकामं केलं नाही तर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या आठवडाभर ही धमकी आपल्याला देण्यात आली. काही वेळ आपण ते सहन केलं. परंतु नंतर बलात्काराची धमकी दिल्यानं भीतीपोटी पोलिसांत एफआयआर दाखल केल्याचं महिलेनं म्हटलं आहे.

“सध्या मी करोनाग्रस्त रूग्णांचे उपचार करत आहे. एकीकडे संपूर्ण देश डॉक्टरांच्या कामाची स्तुती करत आहे. तर दुसरीकडे आपल्या सोसाटीत आपल्याशी गैरवर्तन होत आहे. सोसाटीतील कोणताही रहिवासी आपली साथ देत नाही. त्यांना आपल्या कुटुंबीयांना करोनाची लागण होईल असं वाटत आहे. त्यांनी आम्ही आमचं घर सोडून जावं अशी इच्छा आहे,” असं त्या महिला डॉक्टरनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 12:21 pm

Web Title: odisha doctor lady working on corona patient society member said to vacant flat else will rape jud 87
Next Stories
1 प्रिन्स हॅरी, मेगनच्या सुरक्षेचा खर्च अमेरिका उचलणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका
2 “मला नेण्यासाठी येऊ शकता का?”, चालता चालता प्राण गमावण्यापूर्वी त्याने कुटुंबाला विचारला शेवटचा प्रश्न
3 Coronavirus: याला म्हणतात भारतीय… हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी मुस्लीम बांधवांनी दिला खांदा
Just Now!
X