18 September 2020

News Flash

अमेरिकेत पुन्हा गोळीबार

न्यूयॉर्क : अमेरिकेतील गोळीबाराच्या घटनांची विकृत मालिका सुरूच असून वेबस्टर गावातील रोचेस्टर भागात एका घरी आगीची वर्दी आल्याने धाव घेतलेल्या अग्निशामक जवानांवर झालेल्या गोळीबारात

| December 26, 2012 03:52 am

न्यूयॉर्क :  अमेरिकेतील गोळीबाराच्या घटनांची विकृत मालिका सुरूच असून वेबस्टर गावातील रोचेस्टर भागात एका घरी आगीची वर्दी आल्याने धाव घेतलेल्या अग्निशामक जवानांवर झालेल्या गोळीबारात दोन जवान ठार झाले तर गोळीबार करणाऱ्यानेही स्वतवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.वेबस्टरमधील घरी आग लागल्याची वर्दी येताच अग्निशमन दलाचे जवान तेथे धावले. ते येताच घरालगत एका इसमाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकाराने भांबावलेल्या जवानांपैकी दोघेजण जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणाऱ्यानेही आत्महत्या केल्याने या गोळीबारामागचे गूढ अधिकच वाढले आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2012 3:52 am

Web Title: once again gunfire in america
Next Stories
1 वीरभद्र सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा ‘सहावा डाव’
2 म्यानमारमध्ये विमान रस्त्यावर
3 दूरदर्शनचे पाच कर्मचारी निलंबित
Just Now!
X