17 January 2021

News Flash

पाकिस्तानी अभिनेत्रीची पतीकडून गोळ्या घालून हत्या

गृहकलहातूनच नवऱ्याने त्याच्या पत्नीला ठार केल्याची शक्यता आहे.

पाकिस्तानात महिलांवर होणारे अत्याचार वाढतच चालले आहेत. अशात पाकिस्तानी अभिनेत्रीची तिच्या नवऱ्यानेच गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. अभिनेत्री आणि गायिका रेश्माची हत्या तिच्या नवऱ्यानेच गोळी घालून केली आहे. जिओ टीव्हीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या दोघांमध्ये खटके उडत होते. गृहकलहातूनच नवऱ्याने त्याच्या पत्नीला ठार केल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्माच्या घरात तिचा नवरा आला त्या दोघांणमध्ये भांडण सुरू झाले. ज्यानंतर त्याने पत्नीवर म्हणजेच अभिनेत्री रेश्मावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिथून तो पळून गेला. पोलिसांनी याप्रकरणी रेश्माच्या पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गाणी आणि अभिनय या साठी रेश्मा ओळखली जात होती. झोबल गोलुना या नाटकातली तिची भूमिका चांगलीच गाजली होती. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानात महिला कलाकारांवरचे हल्ले वाढले आहेत. महिला कलाकारावर हल्ला होण्याची ही १५ वी घटना आहे असेही समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 7:28 pm

Web Title: pakistani actress and singer reshma was recently shot dead allegedly by her husband in nowshera kalan area
Next Stories
1 आईची माया! मृत पिल्लाला घेऊन देवमासा दोन आठवडे फिरतोच आहे
2 संसदेत अवतरला ‘हिटलर’, खासदार झाले चकीत!
3 FB बुलेटीन: मराठा आंदोलन अपडेट्स, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे आणि अन्य बातम्या
Just Now!
X